Vishwa Hindu Parishad : 'धर्मांतरण' राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक; देशव्यापी कठोर कायदा आवश्यक!

"कॉर्पोरेट जिहाद" प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषदेची महत्त्वाची मागणी

    15-Apr-2026   
Total Views |
Vishwa Hindu Parishad
 
मुंबई : (Vishwa Hindu Parishad) सतत समोर येणाऱ्या धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, विशेषतः शिक्षित मुस्लिम युवकांमार्फत टीसीएस सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत, विश्व हिंदू परिषदेने देशभरात बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली. विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, टीसीएस नाशिकमधील कथित कट उघड झाल्यानंतर संपूर्ण जग हादरले.(Vishwa Hindu Parishad)
 
एखादा मुस्लिम व्यक्ती उच्च पदावर गेल्यानंतर तो शक्य तितक्या मुस्लिम सहकाऱ्यांना नियुक्त करतो आणि त्यानंतर हिंदू युवक-युवतींना जाळ्यात ओढतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांना मुस्लिम पद्धती शिकवणे, नमाज पढण्यास भाग पाडणे, गोमांस खायला देणे आणि जबरदस्तीने धर्मांतर करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे सुरेंद्र जैन यांनी म्हटले. या कंपनीत कार्यरत असलेल्या सात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या कथित कटाचा पर्दाफाश करून अनेक युवक-युवतींना वाचवले, याबद्दल विहिंपने त्यांचे अभिनंदनही केले आहे.(Vishwa Hindu Parishad)
 
सुरेंद्र जैन पुढे म्हटले की, हा प्रकार केवळ टीसीएस पुरता मर्यादित नसून टेक महिंद्रा (गोरेगाव)सह इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे जाळे पसरलेले असू शकते. आतापर्यंत ‘जिम जिहाद’, ‘थूक जिहाद’, ‘सलून जिहाद’, ‘कोरिओग्राफर जिहाद’ असे प्रकार समोर आले होते, मात्र हे प्रकार कमी शिक्षित लोकांपुरते मर्यादित असल्याचे वाटत होते. परंतु आता अल-फलाह आणि केजीएमयू विद्यापीठांतील व्यक्ती तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत सुशिक्षित लोकही या कथित धर्मांतर कटात सहभागी असल्याचे समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला.(Vishwa Hindu Parishad)
 
व्यवसाय क्षेत्रातही एक नवीन कट उघड झाल्याचा आरोप करत, मलेशियातील एका कंपनीचा मालक जागतिक व्यवसाय क्षेत्रात इस्लामी वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही अशा प्रकारचे कट उघड होत असल्याचे त्यांनी सांगितले. विहिंपने इशारा दिला की, अशा प्रकारांना विरोध करणाऱ्यांना ‘इस्लामोफोबिया’चे लेबल लावणे योग्य नाही. संपूर्ण जग या कथित कटांपासून त्रस्त असून त्यातून मार्ग शोधत आहे, असे त्यांनी म्हटले. भारतात ज्या राज्यांमध्ये कठोर कायदे लागू आहेत, तेथे अशा प्रकारांना आळा बसल्याचा दावा त्यांनी केला.(Vishwa Hindu Parishad)
 
म्हणूनच देशातील सर्व राज्यांनी बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदे करावेत, अशी विहिंपची मागणी आहे. सर्व राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. टीसीएस प्रकरणाची चौकशी एनआयए मार्फत होत असल्याने हा विषय आता राष्ट्रीय स्तरावरील कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने पुढाकार घेत देशव्यापी कायदा करावा आणि राष्ट्रीय सुरक्षेसमोरील या आव्हानाचा कठोरपणे सामना करावा, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.(Vishwa Hindu Parishad)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक