Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनचा प्रश्न सुटणार...

    15-Apr-2026   
Total Views |
Dharavi Koliwada
 
मुंबई : (Dharavi Koliwada)  कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोळीवाड्याची सीमा निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीने येत्या तीन महिन्यांत विस्तर अहवाल सादर करावा असे आदेश नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Dharavi Koliwada) यांनी दिले. धारावी कोळीवाड्याच्या विविध प्रश्नांबाबत बैठकीत बावनकुळे यांनी हे आदेश दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्ह आहते. धारावी कोळीवाड्याला अनेक शतकापासूनचा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे या भागाला धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पूर्णपणे वगळून त्याचे स्वतंत्र बाह्य सीमांकन करावे, अशी आग्रही मागणी अनेक वर्षापासून केली जात होती . या मागणीबाबत स्थानिक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आग्रही होते.(Dharavi Koliwada)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वरावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क 
 
यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली त्यानुसार महसुल मंत्र्यांनी (Dharavi Koliwada) स्पष्ट केले की विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त अथवा मुंबई विभागीय उपसंचालक, धारावी संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी अधिकारी यांचा समावेश असेल. सदर समिती कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाच्या मंजुरीबाबतच्या मागणीचा सर्वंकष विचार करेल, तसेच धारावी कोळीवाड्यातील प्रतिनिधींशी चर्चा करून येत्या तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करेल. त्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल, असे महसुलमंत्री बावनकुळे (Dharavi Koliwada) यांनी स्पष्ट केले.
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.