संगीतभूषण पंडित राम मराठे परिवाराला 'स्वरगंधा संगीत कुटुंब पुरस्कार' जाहीर

    15-Apr-2026   
Total Views |
Swaragandha Sangeet Kutumb Puraskar
 
मुंबई : (Swaragandha Sangeet Kutumb Puraskar) संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा 'स्वरगंधा संगीत कुटुंब पुरस्कार' (Swaragandha Sangeet Kutumb Puraskar) यंदा संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या सांगीतिक परिवाराला जाहीर झाला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित 'गानवर्धन' संस्थेच्या वतीने हा गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप शाल, सन्मानचिन्ह आणि ५०,००० रुपये रोख असा आहे. हा पुरस्कार सोहळा पुण्याच्या सदाशिव पेठ येथील भरत नाट्य मंदिर येथे शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या कालावधीमध्ये पार पडणार आहे.(Swaragandha Sangeet Kutumb Puraskar)
 
हा पुरस्कार पंडित राम मराठे यांचे पट्टशिष्य आणि प्रसिद्ध गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या प्रसंगी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे, खासदार मेधाताई कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रसिक प्रेक्षकांना 'अशी ही सांगीतिक मराठेशाही' हा कार्यक्रम अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये पंडित राम मराठे यांची मुले, कन्या, सून, जावई, नातवंडे आणि पणतवंडे असे कुटुंबातील १२ ते १५ सदस्य सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व संगीत रसिक आणि नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून, जास्तीत जास्त रसिकांनी या सुश्राव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गानवर्धन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.(Swaragandha Sangeet Kutumb Puraskar)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.