Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळासाठी तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास सुरु

तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास केला जाणार, सिडकोतर्फे राईट्स – क्रिएटीव्ह ग्रुप यांची सल्लागार म्हणून नियुक्ती

Total Views |
Navi Mumbai International Airport
 
मुंबई : (Navi Mumbai International Airport) मुंबई महानगर प्रदेशात हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर सिडकोने कवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास हाती घेतला आहे.या अभ्यासासाठी राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी यांच्या संयुक्त उपक्रमाची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा तांत्रिक व व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास आहे. अभ्यास सहा महिन्यांत पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाणार आहे.(Navi Mumbai International Airport)
 
१५ एप्रिल २०२६ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सिडकोच्या सीजीएम गीता पिल्लई, अतिरिक्त मुख्य परिवहन अभियंता बिंदू मुरलीधरन, राईट्स लिमिटेडचे एअरपोर्ट विभागाचे महाव्यवस्थापक अनिल असवानी तसेच क्रेयेटीव्ह ग्रुप एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रीत सिंग शाह उपस्थित होते.(Navi Mumbai International Airport)
 
हेही वाचा : Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनचा प्रश्न सुटणार...
 
यावेळी बोलताना विजय सिंगल म्हणाले की, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशाच्या दीर्घकालीन गरजांसाठी जागतिक दर्जाचे विमानतळ म्हणून उभारले जात आहे. आगामी काळात हवाई प्रवासात मोठी वाढ अपेक्षित असून त्यासाठी आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. या व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागाराची नियुक्ती ही सिडकोची दूरदृष्टी दाखवते. प्रस्तावित तिसरी धावपट्टी विमानतळाची क्षमता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.”(Navi Mumbai International Airport)
 
मुंबई महानगरातील लोकसंख्या २ कोटींहून अधिक असून २०४० पर्यंत हवाई प्रवासाची मागणी १५० MPPAपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ (६० MPPA क्षमता) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (९० MPPA क्षमता) यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. मात्र, २०४७–२०५० दरम्यान ही मागणी २४० MPPA पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढवण येथे तिसऱ्या विमानतळाचा प्रस्ताव असला तरी, संभाव्य वाढत्या मागणीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सिडको कडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराच्या पर्यायांचाही सक्रियपणे अभ्यास केला जात आहे. हा व्यवहार्यता अभ्यास तिसऱ्या धावपट्टीसाठी तांत्रिक, कार्यकारी, पर्यावरणीय आणि आर्थिक पैलूंचे सखोल मूल्यांकन करणार असून, मुंबई महानगर प्रदेशातील हवाई पायाभूत सुविधांना दीर्घकालीन बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(Navi Mumbai International Airport)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.