निरंजन : निरामय निरलस| निष्कलंक निर्भय|

    15-Apr-2026
Total Views |

सन 2012 पासून कोकण विभागातील पदवीधरांचे महाराष्ट्र विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे सतत कार्यमग्न नेतृत्व म्हणजे आमदार निरंजन डावखरे. पदवीधर मतदार संघ म्हणजे बुद्धिजीवींचा समूह, कोकण विभाग म्हणजे दमणगंगा ते तेरेखोल खाडी असा विस्तीर्ण प्रांत. या परिसरात पदवीधरांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे निरंजन डावखरे यांच्या विचारकार्याचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा वेध...

पदवीधर मतदारसंघात काम करताना तमाम पदवीधरांशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करायचे म्हणजे ‌‘अलख निरंजन‌’च व्हावे लागते. आपले निजरूप निरामय, निस्पृह, निष्कलंक, निरुपद्रवी, निराधारांना आधार देणारे, निरागस, निभड व निरंतर निरलस असल्याशिवाय बुद्धिजीवी घटकांचे सातत्याने प्रतिनिधित्व करणे केवळ अशक्यच! पण, आ. निरंजन डावखरे यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. भेटणारी व्यक्ती लहान असो की थोर, तीस भेटताना निरंजन डावखरेंचा भाव सदैव विनम्रतेचाच असतो. समस्या लक्षपूर्वक ऐकून ती सोडवण्यासाठी तत्काळ ‌‘ॲक्शन‌’ घेणे, हा निरंजन डावखरे यांचा स्वभाव; सतत कार्यमग्न राहणे हा त्यांचा अलंकार; जागृकता व लोकाभिमुखता ही त्यांची वृत्ती; तर सर्वांचा विकास हाच त्यांचा ध्यास त्यांच्या जीवनशैलीतून पाहावयास मिळतो. अढळ पाठिंबा, नितांत प्रेम, विश्वासार्हता, आयुष्यातील सर्व आव्हानांमध्ये सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही ते पाळत आलेली वचने आहेत.

राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) ते देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आखलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीकडे निरंजन डावखरेंचा कटाक्ष असतो. विकासाच्या योजना लाभाथपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक स्तरावरही नियोजन व आयोजन असते. त्यांच्या या समर्पित भावनेची दखल घेऊनच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या खांद्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. पदग्रहणानंतर सत्कार सोहळ्यांमध्ये गुंतून न राहता, पक्षवाढीसाठी ते राज्यभर फिरून कंबर कसत आहेत. लोकनेते वसंत डावखरे यांचा समृद्ध राजकीय वारसा व आई शकुंतला यांचे उत्तम संस्कार यांमुळे ते सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी निलिमा यांची भक्कम साथ व अनमोल योगदान त्यांच्या वाटचालीस मोलाची प्रेरणा देत आहे. या उभयतांसह दोन्ही सुपुत्र म्हणजे एक आदर्श भारतीय कुटुंब आहे. ईश्वराच्या कृपेने व जनतेच्या आशीर्वादांमुळे या सर्वांना निरोगी, आनंदी, यशस्वी व उदंड आयुष्य लाभणारच आहे.

कष्ट व सेवा तर अनेकजण करतात, पण त्यात आनंद मानणारे कमी असतात. यशस्वी तर खूप लोक होतात, परंतु इतरांनाही आनंद वाटेल, असे यश खूप कमी लोक मिळवतात. माणसे तर खूप जोडली जातात. आयुष्यात मात्र जीवाला जीव देणारी फार कमी लोकांच्या वाट्याला येतात. निरंजन डावखरे यांचे जीवन खऱ्या अर्थाने असेच दुमळ असणारे आहे. ते जे काम हाती घेतात, ते तडीस नेतात. त्यांच्या मार्गक्रमणात क्वचितच अडथळे येतात. कारण ते अजातशत्रू असणारे खरे लोकप्रिय नेते आहेत.

समुद्राच्या जवळ गेल्याशिवाय त्याची विशालता व पाण्यात उतरल्याशिवाय त्याची सखोलता कळू शकत नाही. तद्वतच निरंजन यांचे व्यक्तिमत्त्व समुद्रासारखेच आहे. त्यांची भावी वाटचाल ही अशी असावी.

रोशन हुआ चिराग, अंधेरे सीमट गये
झुलमत के पर उजालों की कैंची से कट गये
इस दर्जा तेज गाम था में अपनी राह में
रस्ते के लोग खुद ही किनारो पे हट गये|


- सुधीर घागस
(लेखक शिक्षणक्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत.)