मुंबई : (Japan Mosque Protest) जपानच्या फुजिसावा येथे शहरातील पहिल्याच मशिदीच्या बांधकामावरून हजारो जपानी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी दिसून येते, जे ‘अजान’मुळे होणाऱ्या आवाजाविरोधात आणि आपल्या संस्कृतीवर येणाऱ्या धोक्याविषयी घोषणाबाजी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसते की या आठवड्यात हजारो जपानी नागरिक शहरातील पहिल्या मशिदीच्या बांधकामाविरोधात रस्त्यावर उतरले. आंदोलकांचे स्पष्ट म्हणणे आहे की त्यांच्या शहरात एकही मशीद उभारू दिली जाणार नाही.(Japan Mosque Protest)
स्थानिकांचा आरोप आहे की प्रस्तावित मशिदीचा आकार जवळच्या ऐतिहासिक ‘शिंतो श्राइन’ (जपानी मंदिर)पेक्षा खूप मोठा आहे. आंदोलकांनी याला जपानी वारशाविरोधातील ‘उकसवणूक’ असे संबोधले असून त्यांच्या हातात संस्कृती वाचवण्याचे फलक दिसत होते. रहिवाशांनी ‘अजान’मुळे होणाऱ्या आवाजाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, स्थानिक जपानी लोकांनी त्यांच्या पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धतींपेक्षा वेगळ्या मुस्लिम प्रथा-परंपरांबद्दलही भीती व्यक्त केली आहे.(Japan Mosque Protest)
मशिदीचे बांधकाम करणाऱ्या ‘फुजिसावा मस्जिद’ संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत सांगितले की त्यांना जपानवर प्रेम आहे आणि ते सर्व नियमांचे पालन करतील. तरीही, स्थानिक नागरिकांना भीती आहे की हा ‘हळूहळू होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा’ प्रारंभ असू शकतो, ज्यामुळे भविष्यात जपानची ओळख धोक्यात येईल. जपानच्या या कडक भूमिकेची चर्चा सध्या जगभरात होत आहे, आणि सोशल मीडियावर अनेकजण जपानचे कौतुक करत आहे.(Japan Mosque Protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक