डॉ. बाबासाहेबांच्या विचारांसाठी...

    15-Apr-2026   
Total Views |
 
माडवी हिडमा काय थोर देशसेवक की समाजसेवक होता की, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी होता? पण, पुण्यामधील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात माडवी हिडमा याचा उदोउदो करणाऱ्या गीतावर नृत्य झाले. हे का? झारीतले शुक्राचार्य कोण? तसेच, या असल्या घटनांमागची कारणमीमांसा करणारा हा लेख...

ओरे केंद्र वाले, ओरे बंदुक वाले
हमारे हक की जंग हैं हिडमा,
दिलके बस्ती में हिडमा
हमारी हिम्मत तू हिडमा
वापस आ तू हिडमा

पुण्यातील शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात माडवी हिडमा गीतावर नृत्य झाले. हिडमा कोण आहे? या गीतातून असे वाटते की, हिडमा कोणीतरी मोठा देशभक्त, समाजसेवक, गेला बाजार ज्याने लोकांचे भले केले, अशी व्यक्ती असेल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हे गीत वाजले आणि यावर नाच झाला, म्हणजे हा हिडमा अनुसूचित समाजासाठी प्रेरणादायी असावा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी असावा. पण सत्य काय आहे, तर हिडमा हा क्रूर नक्षली होता. 2010 दंतेवाडा हल्ल्यात 76 ‌‘सीआरपीएफ‌’ जवान हुतात्मा झाले, तर 2013 साली झीरम घाटी नरसंहारात 27 लोक मारले गेले. 2021 सुकमा-बीजापूर चकमकीमध्ये 22 सुरक्षारक्षक हुतात्मा झाले. 2005 ते 2025 या कालावधीमध्ये देशासाठी काम करणाऱ्या अर्धसैनिक बलावर, सुरक्षारक्षकांवर पोलिसांवर आणि निष्पाप नागरिकांवर 26 सशस्त्र हल्ले झाले. या हल्ल्यात शेकडो निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि तितक्याच महिलांना वैधव्य आले. अनेक बालके अनाथ झाली. त्यांचे आयुष्य बरबाद झाले. या सगळ्यामागे मुख्य सूत्रधार होता, माडवी हिडमा. छत्तीसगढ, तेलंगणच्या जंगलभागात देशाच्या सुरक्षारक्षकांना घेरून मारणाऱ्या या हिडमाचे गीत पुण्याच्या वसतिगृहात आलेच कसे?

या वसतिगृह परिसरात एकूण सात वसतिगृहे असून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या वसतिगृहाच्या कार्यक्रमामध्ये ‌‘वापस आजा हिडमा‌’ या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण झाले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्ाा. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले. या घटनेची दखल पुणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि समाजकल्याण विभागाने घेतली. चौकशी सुरू करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाबद्दल संबधित प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे गाणे विद्यार्थ्यांकडून अनवधानाने निवडले गेलेे. या वसतिगृहामध्ये केवळ दहा मिनिटांत कार्यक्रम ठरवण्यात आला म्हणे.(?) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रप्रेमी विचारांबद्दल किंवा बाबासाहेबांवर हजारो छान छान गीते आहेत. ‌‘माझ्या भिमानं, माझ्या बापानं सोन्यानं भरली ओटी‌’ किंवा ‌‘उद्धरली कोटी कुळे‌’ वगैरे लाखो गीते आहेत. पण, ती गीते नाकारून या विद्यार्थ्यांपर्यंत हा नक्षली हिडमाचा उदो उदो पोहोचलाच कसा? मुलं कोणतं गाणं निवडतात, काय करतात, याकडे संबंधित विभागाच्या कुणाचेच लक्ष नसावे? या सगळ्याबाबत हे विद्याथ अनभिज्ञ असतील का? हे सगळे पाहून वाटते की, वसतिगृहामध्ये येणारे विद्याथ हे आर्थिक आणि मागासवगय समाजातले होतकरू विद्याथ असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकण्याचा मूलमंत्र दिला, त्याला प्रमाण मानून आपण उच्चशिक्षण घ्यायचेच, हा विद्यार्थ्यांचा निश्चय असतो. त्यानुसार विद्यार्थ्यांपर्यंत डॉ. बाबासाहेबांचे खरे विचार पोहोचणे आवश्यक आहे. सत्तेचा मार्ग बंदुकीच्या गोळीतून जातो, असे म्हणत, सदान्‌‍कदा हिंसेची स्वप्ने पाहणारी माओवादी विचारसरणी, तसेच कम्युनिस्ट विचारधारेलाही डॉ. बाबासाहेबांचा विरोध होता. ‌‘लाल सलाम‌’च्या कारवायांमुळे समाजाचे नुकसान होते, ते समाजाची दिशाभूल करतात, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. असे असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या वसतिगृहात बंदुकी हिंसेचे समर्थन करणारे गीत, क्रूर नक्षलीचे महिमामंडन करणारे गीत वाजलेच कसे?

अजाण विद्यार्थ्यांना या विचारधारेकडे वळवले जाण्यासाठी हे कुणीतरी घडवले, हे कारण असू शकते का? तर मग, या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला अलगदपणे हिंसेकडे वळवणारेे हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? सरकारी शिक्षण संस्था, समाजाच्या वसतिगृहामध्ये असे शुक्राचार्य आहेत का? की जे व्यवस्थापक, शिक्षक, कर्मचारी, अध्यापक यांचे मुखवटे घालून समाजविघातक विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवत आहेत. (असे लोक कमी आहेत) तसेच महामानवाच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त किंवा इतरही वेळी प्रबोधनाच्या नावाने या वसतिगृहामध्ये कोण जाते, यावरही विचार होणे आवश्यक आहे. समाजकल्याण खात्याच्या अधिपत्याखाली असणारी ही वसतिगृहे समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहेत. इथे युवा शिक्षणाची क्षेत्रे पादाक्रांत करतात. पण इथेच जर असे घडत असेल किंवा घडवणारे लोक घुसले असतील, तर हे भयंकर आहे. जेएनयू असू दे की जामिया मिलीया की देशभरातल्ाी विद्यापीठ त्यांचे या संदर्भात ऑडिट होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या नावाने कोणतेही समाजविघातक बीज रूजणार नाही, यासाठी प्रशासनाने पावलं उचलणे गरजेचे आहे.

हे वाटते, कारण राष्ट्रप्रेमी आणि समाजप्रेमी सरकार सत्तेत असूनही अनेकदा समाजाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय संस्थांमध्ये नेमके राष्ट्रीय एकतेच्या विरोधात विचारकृती असणारे लोक कार्यक्रमाला बोलावले जातात किंवा सामाजिक दुही पेरणारे नाटक, व्याख्यानाचे आयोजन झालेले दिसते. तसेच या असल्या विचारांच्या लोकांना सरकारी पुरस्कार,सन्मान प्राप्त होताना दिसतो किंवा त्यांची चांगल्या समित्यांवर वणही लागल्याचे दिसते. हेच लोक राज्य सरकार, केंद्र सरकारविरोधात अखंड कंठशोषही करत असतात आणि समाजात त्यांचे विचार लादण्यासाठी विद्यमान सरकारने दिलेल्या संधी-सुविधांचा वापरही करतात. हे का होत असेल? कारण, आठवा तो ‌‘द केरळ स्टोरी‌’ चित्रपटातला संवाद. दहशतवादाकडे वळलेला तो विद्याथ दहशतवाद्यांना भेटायला जात असतो. तेव्हा तो त्याच्या प्राध्यापिकांना विचारतो की, “सरकार आणि पोलीस त्यांचे आहेत; मी तिथे कसे जाणार?” यावर ती प्राध्यापिका गोड हसत म्हणते की, “सरकार त्यांचे आहे; पण प्रशासनात तर आपले लोक आहेत.” या पार्श्वभूमीवर जातीय, व्ािद्ध्वंसक आणि भ्रष्टचारी कटकारस्थानाला पुरून उरणारे देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. त्यांना, सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की, विघातक विचारवाल्या ज्या व्यक्ती सत्ता, प्रशासनात, विविध आयेाग आणि समित्यावर ठाण मांडून बसल्या आहेत, त्यांची चौकशी व्हावी. कारण, जसे देशभक्त कट्टर आहेत, तसेच समाजविघातक व्यक्तीही त्यांच्या अविचारांशी कट्टर आहेत. जिथे असतील, तिथून ते त्यांची कारस्थान करतात. ते वाळवी आहेत. समाजाची आणि विद्यार्थ्यांची मानसिकता, विचार भविष्य नव्हे, अख्खे जीवन ते कुरतडत आहेत. न्याय, हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ते समाजाला, विद्यार्थ्यांना हिंसेकडे नक्षली समर्थनाकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्याने या असल्या छुप्या समाजविघातकांवर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या समाजाला ‌‘अरे ओ बंदुकवाले,‌’ विचाारसरणीच्या समाजविघातक लोकांची गरज नाही, तर संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे! जय भिम!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.