Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उबाठा गटाचे नवे कार्याध्यक्ष? चर्चांना उधाण

    15-Apr-2026   
Total Views |
Aditya Thackeray
 
मुंबई : (Aditya Thackeray) उबाठा गटाचे युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नवे कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा बुधवारी राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
 
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे उबाठा गटाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. २००३ मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती, त्याचप्रमाणे येत्या १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी आदित्य ठाकरेंवर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली.(Aditya Thackeray)
 
शिवाय संजय राऊत यांच्या विधानाने या चर्चांना दुजोरा मिळाला. ते म्हणाले की, "हे निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरेसुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आता आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असल्यास त्याचे स्वागत केले पाहिजे. पुढील राजकारण तरुणांच्या हातात जायला पाहिजे," असे ते म्हणाले.(Aditya Thackeray)
 
पक्षात कुठलीही चर्चा नाही - आदित्य ठाकरे
 
या सगळ्यानंतर आदित्य ठाकरेंनी 'एक्स'वर पोस्ट करत या चर्चा फेटाळून लावल्या. "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की, मला पक्षात काही पद दिले जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी," असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्ट केले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....