Navnath Ban : मविआ सरकारने इंदू मिल स्मारकाचे काम थांबवले

नवनाथ बन यांची टीका

    14-Apr-2026   
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केले. त्यामुळे संजय राऊत यांना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केले.
 
नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प ठेवल्यानेच स्मारकाच्या कामाला उशीर होत आहे. एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडे असल्याचे भान ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आणि डिसेंबर २०२६ पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा भाजपा-महायुती सरकारचा मानस आहे."(Navnath Ban)
 
संजय राऊत नेमके कुणाच्या बाजूने?
 
"भोंदूबाबा खरातनंतर संजूबाबा राऊत नवा धंदा सुरू करून रोज खोटे बोलत आहेत. त्यांना इतकेच सांगायचे आहे की, अंजली दमानियांना कुठून माहिती मिळते याची चौकशी सुरू आहे आणि कुणाला फोनकॉल केला म्हणून तो लगेच दोषी होत नाही. संजय राऊत, तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने आहात? भोंदूबाबा अशोक खरातच्या की, पीडित महिलांच्या ते आधी स्पष्ट करा. ज्या पद्धतीने संजय राऊत भोंदूबाबाचे समर्थन करत आहेत त्यात निश्चितच काहीतरी काळेबेरे आहे. भोंदूबाबा खरातला मदत करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि स्वतः संजय राऊत तुम्हीही केले. तुमच्याच सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी दिले होते. तुम्ही नाशिकचे संपर्कप्रमुख होतात. मग भोंदूबाबा खरातबद्दल माहिती समोर येत असल्यास तुमच्या पोटात का दुखू लागले? उद्या कदाचित संजय राऊत यांच्याही फोनकॉलची माहिती समोर येईल. त्यामुळे ते आजपासून वातावरणनिर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत," असेही ते (Navnath Ban) म्हणाले.
 
हेही वाचा : Amravati Minor Girl Video Leak Case: सोशल मीडियाद्वारे १८० अल्पवयीन मुलींचं शोषण, आरोपी अयान अहमद अटकेत  
 
विनाकारण अफवा पसरवू नका
 
"मुंबईतली खेळाची मैदाने ही विद्यार्थी, खेळाडूंसाठीच असतील, हेच या सरकारचे धोरण आहे. तिथे कुठल्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. कोरोनाकाळात कशा पद्धतीने बिल्डरांवर उधळपट्टी करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कुठल्याही मैदानावर पंचतारांकित हॉटेल उभे केले जात नाही. संजय राऊत थोडीशी माहिती घ्या आणि मग बोला. विनाकारण अफवा पसरवण्याचे काम करू नका. कुठल्याही बिल्डरच्या घशात अशा पद्धतीने मैदान देता येत नाहीत हे थोडे तपासून घ्या. महाविकास आघाडी सरकार असताना बिल्डरांना रेड कार्पेट आणि मोठेमोठे मोक्याचे भूखंड देण्याचे काम केले. संजय राऊत, तुमची किती बिल्डरांसोबत भागीदारी आहे हे महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही," अशी टीकाही नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....