मुंबई :(Punyashlok Ahilyadevi jalyatra)"गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २९२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत (Punyashlok Ahilyadevi jalyatra)मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.
...अशी असेल जलयात्रेची रूपरेषा
२५ एप्रिल रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गाने इंदूर येथे २९ एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या(Punyashlok Ahilyadevi jalyatra) मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....