मुंबई : (Indian LPG Vessel Jag Vikram to Reach Kandla) अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज असलेले ‘जग विक्रम’ हे एलपीजी मालवाहू जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताकडे मार्गस्थ झालं आहे. सुमारे २० हजार ४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज १४ एप्रिल रोजी कांडला बंदर येथे पोहोचणार आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. (Indian LPG Vessel Jag Vikram to Reach Kandla)
युद्धविरामाच्या यशस्वीनंतरचे पहिले भारतीय जहाज
अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जग विक्रम' या जहाजाने ११ एप्रिल रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली होती आणि जहाजावरील सर्व २४ खलाशी सुरक्षित आहेत. ही घडामोड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे; कारण अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच जाहीर झालेल्या १४ दिवसांच्या युद्धविरामानंतर, या मार्गावरून प्रवास करणारे हे भारताचा ध्वज असलेले पहिलेच जहाज ठरले आहे. (Indian LPG Vessel Jag Vikram to Reach Kandla)
At present, all Indian seafarers in the #PersianGulf region are safe. No incident involving Indian-flagged vessels has been reported in the past 24 hours
The Indian-flagged LPG vessel Jag Vikram crossed the Strait of #Hormuz on 11th April. The vessel is carrying around 20,400… pic.twitter.com/DHecDnjUXT
'जग विक्रम' या जहाजाचा यशस्वी प्रवास भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आखाती प्रदेशाचे असलेले महत्त्व अधोरेखित करतो. देशाच्या एकूण LPG आयातीपैकी जवळपास ९० टक्के आयात आखाती देशांतून केली जाते; त्यामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मार्गे होणारा सुरक्षित सागरी प्रवास भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जग विक्रम’च्या आगमनामुळे देशांतर्गत बाजारपेठेत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Indian LPG Vessel Jag Vikram to Reach Kandla)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\