सिडकोच्या चार अग्निशामकांना राष्ट्रीय स्तरावरील गौरव

Total Views |
ciddco
 
नवी मुंबई :(CIDCO)सिडको महामंडळातील चार अग्निशामक कर्मचाऱ्यांना यंदाच्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त डायरेक्टर जनरल फायर सर्व्हिस यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अग्निशामक नितीन कीर्तने, गोविंद गडगे, कैलास शिरसाट आणि संभाजी पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
 
या यशामागे माननीय व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या योग्य नेतृत्वामुळेच कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी करता आली, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.(CIDCO)
 
हेही वाचा :  Tribute to Asha Bhosle : स्वरसम्राज्ञी, पद्मविभूषण आशा भोसले यांना मुंबई महापालिकेत श्रद्धांजली
 
महाराष्ट्रातून एकूण 29 जणांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात सिडकोच्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने महामंडळासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. या सन्मानामुळे सिडकोच्या अग्निशमन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून, भविष्यात अधिक जोमाने आणि तत्परतेने सेवा देण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना यावेळी सिडकोने व्यक्त केली. (CIDCO)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.