Chandrashekhar Bawankule : अमरावती प्रकरण गंभीर, दोषींना कठोर शिक्षा होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule
14-Apr-2026
Total Views |
नागपूर :(Chandrashekhar Bawankule)अमरावतीतील महिला अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule)यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमरावती प्रकरणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांशी तातडीने चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुरावे पोलिसांकडे सादर केले असून सखोल चौकशी सुरू आहे. हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषय असून सरकार याकडे पूर्ण गांभीर्याने पाहत आहे.
रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले ,रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले, याबद्दल मला माहिती नाही. माध्यमांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते बोलत असतात, त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीत अनुपस्थितीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मंगळवारी होणारी बैठक सोमवारी घेण्यात आली होती.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसावेत. मलाही
नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आले नाही.
राज्यात वाढत्या ड्रग्सविरोधी कारवायांबाबत बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार प्रत्येक घटनेवर कारवाई करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ड्रग्सविरोधात मोठे जाळे उभे करण्यात आले असून आता कुणीही त्यातून सुटणार नाही.
हेही वाचा : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात वादग्रस्त सादरीकरण; माओवादी संदर्भांमुळे तपास यंत्रणा सतर्क”
खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात खरात बाबत संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे. कोणाकडेही पुरावे असतील तर ते एसआयटीकडे द्यावेत. विनाकारण आरोप करून चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न योग्य नाही.
नाशिक प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच नाशिक आयजींच्या फोटोबाबत कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी एसआयटी चौकशीची प्रतीक्षा करावी.”
जयंत मुनी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, शस्त्रपूजा ही परंपरेचा भाग आहे, मात्र कोणत्याही प्रकारचे समर्थन करता येणार नाही. त्यांनी नेमके काय म्हटले हे माहित नाही.
महिला अधिनियमाबाबत त्यांनी सांगितले की, या विधेयकामुळे लोकशाही अधिक मजबूत होईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल असेही बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule)म्हणाले.