Mumbai Local : नवी दरवाजे असणारी नॉन एसी लोकल मुंबईत दाखल

Total Views |
Mumbai Local
 
मुंबई : (Mumbai Local) मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेला नॉन-एसी, स्वयंचलित दरवाजे असलेला नवीन लोकल रेक मुंबईत दाखल झाला आहे. हा अत्याधुनिक रेक लवकरच मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.(Mumbai Local)
 
मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन रेकचा उद्देश प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि संरक्षित प्रवासाचा अनुभव देणे हा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संकल्पनेनुसार आयसीएफने ही आधुनिक लोकल विकसित केली आहे.(Mumbai Local)
 
या नव्या लोकलमध्ये तीन प्रमुख वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सर्वप्रथम, या गाडीत स्वयंचलित बंद होणारे दरवाजे आहेत, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश भाग लुव्हर प्रकारच्या दरवाजांनी आणि उर्वरित एक तृतीयांश भाग काचेच्या दरवाजांनी बनलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षिततेसह बाहेरील स्थानकांची माहिती सहजपणे मिळू शकते.(Mumbai Local)
 
हेही वाचा : Vande Bharat : मुंबई ते बंगळुरू मार्गावर नवी वंदे भारत धावणार
 
दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्हेस्टिब्युल कनेक्टिव्हिटी म्हणजेच या रेकमध्ये सहा डब्यांचे दोन विभाग असून, त्यामध्ये व्हेस्टिब्युलद्वारे डब्यांदरम्यान सहजपणे प्रवास करता येणार आहे. यामुळे एका डब्यातील गर्दी कमी होऊन प्रवाशांना सोयीस्कर हालचाल करता येईल. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टीम छतावर बसवण्यात आल्यामुळे डब्यांमधील हवा सतत खेळती राहील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.(Mumbai Local)
 
मुंबईत दाखल झाल्यानंतर या डब्यांची आरडीएसओमार्फत आवश्यक तांत्रिक आणि कार्यप्रणाली चाचण्या (ट्रायल्स) घेण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष चाचण्या घेऊन दरवाज्यांची कार्यक्षमता, चढ-उताराची सुलभता आणि सुरक्षितता तपासली जाईल. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आणि कोणतीही त्रुटी आढळली नाही तर हा नवीन लोकल रेक लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. जर काही त्रुटी आढळल्या, तर त्या तात्काळ दूर करून सुधारित रेक पुन्हा सेवेत आणला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.(Mumbai Local)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.