Chitra Wagh Meets Kishori Pednekar : आमदार चित्रा वाघ यांनी घेतली किशोरी पेडणेकर यांची भेट

नारी शक्ती वंदन अधिनियमास पाठिंब्यासाठी चर्चा

    13-Apr-2026
Total Views |
Chitra Wagh Meets Kishori Pednekar

मुंबई : (Chitra Wagh Meets Kishori Pednekar) नारी शक्ती वंदन अधिनियमास पाठिंबा मिळावा यासाठी भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष,आमदार चित्रा वाघ यांनी उबाठा गटाच्या माजी महापौर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांची सोमवार दि.१३ रोजी सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी वाघ यांनी याविषयात यापूर्वी उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची देखील भेट घेतली होती.(Chitra Wagh Meets Kishori Pednekar)
 
हेही वाचा :  उध्दव ठाकरेंनी राजकीय धुरंधरपणा दाखवला असता तर ही वेळ आली नसती- प्रविण दरेकर
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला किशोरी पेडणेकर यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा नक्कीच स्वागतार्ह आहे.धन्यवाद किशोरीताई." अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी यावेळी दिली.(Chitra Wagh Meets Kishori Pednekar)
 
"पक्ष वेगळा, विचार वेगळे आणि कितीही मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न नारीशक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात." असेही वाघ यांनी स्पष्ट केले.(Chitra Wagh Meets Kishori Pednekar)