Gare Palma Coal Project : ऊर्जा सुरक्षिततेकडे महाराष्ट्राची वाटचाल

गारे पालमा कोळसा प्रकल्प देणार विकासाला नवे बळ!

Total Views |
Gare Palma Coal Project
 
मुंबई : (Gare Palma Coal Project) राज्याच्या वीज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या छत्तीसगडमधील महानिर्मितीच्या पहिल्या गरे-पालमा कोळसा खाणीतून उत्पादनास सुरुवात झाली असून, या खाणीतील पहिली कोळसा रेल्वे रॅक कोराडी महाऔष्णिक केंद्रात दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. या प्रकल्पामुळे (Gare Palma Coal Project)  राज्याचे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होणार असून राज्यातील लोडशेडिंग कमी होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सुलभ होईल, तसेच भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होईल व या खाणीमुळे पुढील 77 वर्ष उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(Gare Palma Coal Project)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी, नागपूर येथे महानिर्मितीच्या गारे पालमा सेक्टर 2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकच्या आगमन प्रसंगी कोळसा हाताळणीच्या अत्याधुनिक पद्धतीची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि विदर्भाला राज्याचे ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी केली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.(Gare Palma Coal Project)
 
हेही वाचा : Anand Bullet Train Station : भारताची दुग्ध राजधानीत 'आणंद' बुलेट ट्रेन स्टेशन सज्ज!
 
गारे पालमा या कोळसा खाणीतून अत्यंत उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होत असल्याने ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे आणि ऊर्जा निर्मितीसाठी आधीपेक्षा कमी कोळसा लागणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासोबत विजेचे दर कमी होण्यास मदत होईल.(Gare Palma Coal Project)
 
या कोळसा खाणीतून कोराडी, चंद्रपूर आणि परळी येथे दीर्घकालीन कोळसा पुरवठा होणार आहे. महाऊर्जाला उपलब्ध झालेल्या या खाणीमुळे कोळशाच्या गुणवत्तेवर नियंत्रण राखता येणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणार आहे. यामुळे भविष्यातील वीज तुटवड्याचा धोका कमी होणार असून दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.(Gare Palma Coal Project)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.