Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सरच्या धडकेत ९ ठार!

    13-Apr-2026   
Total Views |

Kalyan-Ahilyanagar Highway Accident

मुंबई : (Kalyan-Ahilyanagar Highway Accident)
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड रोडवर सोमवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. रायते पुलावर प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात घडल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदत केली. या अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे व्हॅनमधील प्रवासी असून, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, बचाव आणि वैद्यकीय पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही प्रवासी व्हॅन कल्याण ते मुरबाड या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होती. पाच आसनांच्या या गाडीत १२ प्रवासी कोंबून भरले होते. ही गाडी सुसाट वेगाने मुरबाडच्या दिशेने जात होती. याचवेळी रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची आणि व्हॅनची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की यात प्रवासी व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून काँक्रिटीकरणही केले जाते आहे. त्यामुळे प्रवास वेगवान झाला आहे. मात्र अनेक वाहनांचे नियंत्रण सुटत असल्याने अपघातही होत असल्याचे समोर आले होते. अशातच आता हा प्रवासी व्हॅनचा भीषण अपघात झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\