स्व-आधारित राष्ट्रनिर्माण हे आपले नागरी कर्तव्य आहे! जे नंदकुमार यांचे प्रतिपादन

    13-Apr-2026   
Total Views |
j. kumar rashtriy swayamsevak sangh
 
मुंबई :(J. Nandakumar) आत्मविस्मृती झालेला राष्ट्र विनाशाच्या दिशेने वाटचाल करतो. आजही औपनिवेशिक मानसिकतेमुळे भारताची स्व-आधारित व्यवस्था नष्ट झाली आहे. स्वातंत्र्यानंतर आता विकसित भारतासाठी ‘स्व’-आधारित राष्ट्रनिर्माण करणे हे आपले नागरी कर्तव्य आहे", असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले.
 
पुण्याच्या कोथरूड येथील मयूर कॉलनीमध्ये आयोजित ‘भारतीय संस्कृती संगम’ व्याख्यानमालेत ‘स्व-बोध’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी निवृत्त आयकर आयुक्त डॉ. सुहास कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर मंचावर उपस्थित होते.(J. Nandakumar)
 
उपस्थितांना संबोधत जे. नंदकुमार पुढे म्हणाले, “प्रत्येक राष्ट्राचे एक स्वतःचे ‘स्व’ असते. विश्वकल्याण हे भारताचे स्व-बोध आहे. भारतीय सभ्यता प्राचीन, चिरंतन आणि नित्य नूतन आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात सर्व क्षेत्रांत स्व-आधारित दृष्टिकोन विकसित झाला होता. मात्र, दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यावर पुरेशी चर्चा झाली नाही. परिणामी, आपण ज्या ठिकाणी पोहोचायला हवे होते, तेथे पोहोचू शकलो नाही.”(J. Nandakumar)
 
हेही वाचा :  महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन आणि मंत्रालयात अभिवादन
 
पुढे ते म्हणाले की, “भारताचा आत्मबोध केवळ मानवकेंद्रित नसून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना बाळगणारा आहे. ‘सर्वे सन्तु निरामयाः’ हीच आपली भूमिका आहे. राष्ट्रीयत्व हेच सनातन धर्म आहे आणि तेच भारताची राष्ट्रीय चेतना आहे. एका बाजूला देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू असताना, आपण आपल्या अस्मिता आणि स्वभावसंस्कारांच्या मूल्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे.”(J. Nandakumar)
 
जातिभेद दूर करणे आवश्यक : डॉ. सुहास कुलकर्णी
 
डॉ. सुहास कुलकर्णी यांनी आत्मबोधाच्या गरजेवर भर देत सांगितले की, “भौतिक जगात व्यावहारिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात स्वतःची ओळख म्हणजेच ‘स्व-बोध’ असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जातीभेद निर्माण करून समाजाला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी आत्मबोधाचे जागरण ही काळाची गरज आहे.”(J. Nandakumar)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक