अल्लू अर्जुनच्या 'राका'साठी हार्दिक पांड्याचं मैदानात खास जेस्टर

    13-Apr-2026
Total Views |

मुंबई : क्रिकेट आणि सिनेमाचा भन्नाट संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला, जेव्हा हार्दिक पांड्या याने आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यात मैदानावर एक खास अंदाज सादर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या रोमांचक सामन्यादरम्यान हार्दिकने अल्लू अर्जुन अभिनित आणि अ‍ॅटली दिग्दर्शित बहुचर्चित ‘राका’ चित्रपटातील सिग्नेचर ‘राका’ जेस्चर मैदानावर रीक्रिएट केला. Sun Pictures निर्मित या चित्रपटाचे हे जेस्चर आधीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.




सामन्यादरम्यान हार्दिकने आत्मविश्वासाने हा जेस्चर सादर करताच प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला आणि “राका मेनिया” ट्रेंड होऊ लागला. हा क्षण भारतातील क्रिकेट आणि सिनेमामधील घट्ट नात्याचं पुन्हा एकदा दर्शन घडवणारा ठरला. चित्रपटातील आयकॉनिक स्टाइल्स आणि क्षण आता फक्त पडद्यावर मर्यादित न राहता थेट मैदानावरही दिसू लागले आहेत. त्यामुळे या सामन्याला एक वेगळाच पॉप-कल्चर टच मिळाला.


हार्दिक पांड्या आपल्या स्टायलिश आणि एक्सप्रेसिव ऑन-फिल्ड अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचा आत्मविश्वास आणि एंटरटेनमेंट यांचा मिलाफ अनेकदा चर्चेचा विषय ठरतो, जो अल्लू अर्जुनच्या मोठ्या पडद्यावरील दमदार उपस्थितीची आठवण करून देतो.

दरम्यान, ‘राका’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चेत असून या घटनेनंतर त्याची क्रेझ आणखी वाढली आहे. आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर या जेस्चरला मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘राका’चा प्रभाव फक्त प्रमोशनपुरता मर्यादित न राहता एक मोठा सांस्कृतिक ट्रेंड बनण्याची चिन्हं दिसत आहेत.