आशा भोसले यांच्या जाण्याने संगीत विश्वात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    13-Apr-2026
Total Views |

draupadi murmu speaks about asha bhosale
 
नवी दिल्ली :(Asha Bhosle Death)आपल्या शोक संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात,"आशा भोसले यांच्या जाण्याने (Asha Bhosle Death)संगीत विश्वात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.एक दिग्गज गायिका म्हणून त्यांच्या महान कारकिर्दीने भारतीय संगीताचा एक काळ गाजवला.त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधल्याच्या माझ्याकडे सुखद आठवणी आहेत.
 
 
एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून त्यांनी आपले आयुष्य स्वतःच्या अटींवर जगले.त्यांचे संगीत सदैव जिवंत राहील.त्यांचे जाणे हे संगीतप्रेमींसाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे.मी त्यांचे कुटुंबिय आणि असंख्य चाहत्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते."