Donald Trump : "असे पोप नको...", म्हणत ट्रम्प यांनी स्वतःचाच 'देवदूत' अवतारातला फोटो केला पोस्ट

    13-Apr-2026   
Total Views |

Donald Trump


मुंबई : (Donald Trump) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी स्वतःचा येशू ख्रिस्तासारख्या रुपातील एआय जनरेटेड फोटो पोस्ट केला आहे, ज्यात भोवती दैवी प्रकाश आणि बाजूला देवदूत आणि सैनिकांसारख्या आकृत्या आहेत. अशा अवतारात ते एका व्यक्तीवर उपचार करताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे रविवारी रात्री ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे यांच्यावर 'कमकुवत' असल्याची टीका केल्यानंतर लगेचच हा फोटो शेअर केल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.(Donald Trump)
 
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे यांच्या जागतिक मुद्द्यांवरील भूमिकेवर बोचरी आणि वैयक्तिक टीका केली. इराणच्या त्यांनी पोप यांना "परराष्ट्र धोरणात अत्यंत वाईट" आणि "गुन्हेगारी रोखण्यात कमकुवत" असे संबोधले. एका लांबलचक पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पोप यांना प्रत्युत्तर दिले. अणूमहत्त्वाकांक्षेबाबत नरमाईची भूमिका घेतल्याच्या आणि परदेशातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईला विरोध केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केली. लिओ यांनी कोविड महामारीच्या काळात चर्चवर आलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून आपल्या अध्यक्षपदाची भीती अधोरेखित केली आहे.(Donald Trump)

पोप यांनी ट्रम्प यांच्याशी वादविवाद करण्यास नकार दिला; म्हणाले: "मी राजकारणी नाही"

पोप लिओ १४ व्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणत्याही स्वरूपाचा वादविवाद करण्यास नकार दिला आहे. सोमवारी, आफ्रिकेतील अल्जीरियाच्या दौऱ्यावर असताना, पोप लिओ १४ व्यांनी पत्रकारांना बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "मी राजकारणी नाही आणि ट्रम्प यांच्याशी वादविवाद करण्याचा माझा कोणताही इरादा नाही." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जगभरात शांततेचा प्रसार करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे.(Donald Trump)




ट्रम्प यांची पोस्ट
 
"पोप लिओ हे गुन्हेगारी रोखण्यात दुबळे आणि परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत वाईट आहेत. ते ट्रम्प प्रशासनाच्या 'भीती'बद्दल बोलतात, पण कोव्हिडच्या काळात कॅथोलिक चर्च आणि इतर ख्रिश्चन संघटनांमध्ये जी भीती होती, त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. त्यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सभा घेतल्याबद्दल पाद्री, मंत्री आणि इतर सर्वांना अटक केली जात होती. अगदी लोक बाहेर असताना आणि एकमेकांपासून दहा-वीस फूट लांब असतानाही. मला त्यांचा भाऊ लुईस, लिओपेक्षा जास्त आवडतो, कारण लुईस पूर्णपणे MAGA (Make America Great Again) विचारांचा आहे. त्याला गोष्टी समजतात, पण लिओला नाही!", असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
 
"मला असा पोप नको आहे ज्याला इराणकडे अण्वस्त्र असणे योग्य वाटते. मला असा पोप नको आहे ज्याला अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करणे चुकीचे वाटते, असा देश जो अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पाठवत होता आणि त्याहूनही वाईट म्हणजे, त्यांच्या तुरुंगातील खुनी आणि ड्रग्ज माफियांना आमच्या देशात सोडून तुरुंग रिकामे करत होता. आणि मला असा पोप नको आहे जो अमेरिकेच्या अध्यक्षांवर टीका करतो, कारण मी नेमके तेच करत आहे ज्यासाठी माझी प्रचंड बहुमताने निवड झाली आहे, मी गुन्हेगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर कमी केले आहे आणि इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजार तेजी (Stock Market) निर्माण केली आहे", असं ते म्हणाले.
"लिओने कृतज्ञ असायला हवे, कारण सर्वांना माहीत आहे की त्यांची निवड एक धक्कादायक आश्चर्य होते. पोप होण्याच्या कोणत्याही यादीत त्यांचे नाव नव्हते. चर्चने त्यांना तिथे फक्त यासाठी बसवले कारण ते अमेरिकन होते आणि त्यांना वाटले की अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्याशी व्यवहार करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असेल. जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते. दुर्दैवाने, लिओची गुन्हेगारी आणि अण्वस्त्रांबाबतची मवाळ भूमिका मला पटणारी नाही. तसेच, ते डेव्हिड एक्सेलरोड सारख्या ओबामा समर्थकांना भेटतात, जे डाव्या विचारसरणीचे अपयशी लोक आहेत आणि ज्यांना चर्चमध्ये जाणाऱ्यांना आणि धर्मगुरूंना अटक व्हावी असे वाटत होते. लिओने पोप म्हणून आपली वागणूक सुधारावी, व्यवहारी बुद्धीचा वापर करावा, कट्टर डाव्यांचे लाड करणे थांबवावे आणि राजकारणी न होता एक 'महान पोप होण्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे त्यांचे स्वतःचे खूप नुकसान होत आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, कॅथोलिक चर्चचे नुकसान होत आहे!" असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\