वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाला किंमत होती - नवनाथ बन

प्रियांका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे गट एकत्र तर राऊत एकटे पडले आहेत असेही प्रत्युत्तर

    13-Apr-2026
Total Views |
Navnath Ban VS Sanjay Raut
 
मुंबई :(Navnath Ban Press Conference) "एकाच ठाकरेंच्या नावाला किंमत होती ते नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर संजय राऊत यांच्या नावाला काहीही किंमत नाही.हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावर शिवसेना उभी केली. पण संजय राऊत सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत. राऊत यांनी हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी विचार सोडलेले आहेत आणि ज्यांनी विचार सोडले असतात त्यांना समाजात काहीही किंमत नसते. तुमची विचार शून्यता लोकांना लक्षात आली त्यामुळे उबाठाला लोकांनी घरी बसवल आहे."अशी खरमरीत टीका भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवार दि.१३ रोजी राऊत यांच्यावर केली.
 
"वारसा आणि वारसदाराच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नयेत.कारण राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाही तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे वारसदार झाले आहेत. शरद पवार यांचा उदो उदो करायचा हा राऊत यांचा धंदाच झालेला आहे.त्यामुळे आम्ही ठाकरेंचे वारसदार आहोत हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी पडू नये. प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले की राऊत यांना लगेच मिरच्या झोंबू लागल्या आहेत. येणाऱ्या काळात प्रियांका चतुर्वेदी राऊत यांच्या विरोधात निश्चित उभ्या राहतील. चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांचा गट एकत्र आहे राऊत उबाठा मध्ये एकटे पडले आहेत.राहुल गांधी चांगले काम करू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन कुणी करणार नाही हे राऊत यांना माहीत आहे."असेही बन म्हणाले.
 
 
" मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची हे आयोग ठरवेल. मतदार संघ फोडण्याबद्दल राऊत जी भाषा वापरतात ती चुकीची आहे.जनतेने तुम्हाला विधानसभेला ,महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेत मत न देता फोडण्याचे काम केले आहे. ज्या राऊत यांना मतदारसंघच नाही ते केव्हापासून ही चिंता करू लागले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण देखील योग्य टाकले जाईल." असेही बन यांनी स्पष्ट केले.