करिते जीवनाची भैरवी...

    13-Apr-2026   
Total Views |

स्वरसम्राज्ञी आशाताईंचा स्वर अखेर निमाला... त्यांनी प्रत्येक शब्दाला केवळ संगीतबद्ध केले नाही, तर त्यात प्राण ओतला, त्याला स्पंदन दिले, अर्थ दिला, आयुष्य दिले. आशाताईंच्या आवाजात एक विलक्षण चैतन्य होते. क्षणात खट्याळ हसू, क्षणात अंतर्मुख शांतता, तर क्षणात उत्कट भावनांचा ओघ. म्हणूनच त्यांच्या सुरांनी काळाचे बंधन ओलांडले; पिढ्यान्‌‍पिढ्या त्यांनी मनांवर आपले गारूड कायम ठेवले. त्यांच्या गाण्यांतून माणूस स्वतःला भेटला, हरवला आणि पुन्हा सापडलादेखील. आज त्या सूरांचीच भैरवी झाली आहे. रंगमंचावर संगीतकला सादर करताना अनेकदा मधुर भैरवी सादर करणाऱ्या आशाताईंचे जाणे, रसिकांच्या काळजाला चटका लावणारेच. आशाताईंचे भारतीय संगीतविश्वातील योगदान अतुलनीय असेच. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक पिढीमध्ये त्यांचे चाहते आहेत, एवढे मोठे त्यांचे कर्तृत्व आहे. अशा या संगीत सम्राज्ञीच्या स्वरयात्रेचा ‌‘करिते जीवनाची भैरवी‌’ या विशेष पानातून मागोवा घेत वाहिलेली श्रद्धांजली.

आशा भोसले यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

आशाताईंचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर

मंगेशकर भावंडांमध्ये आशाताईंचा क्रमांक तिसरा

संगीताचा ज्ञान त्यांनी वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळवले.

वयाच्या नवव्या वष आशाताईंना पितृशोक

पुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बहीण लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यास सुरुवात

वयाच्या 16व्या वष गणपतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

आशा भोसले यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले.

आशा भोसले यांना तीन मुले असून, त्यांपैकी दोघांचे निधन झाले आहे.

त्यांचे पुत्र आनंद भोसले आशाताईंचे कामकाज सांभाळत

आशाताईंना जनाई भोसले आणि रंजय भोसले अशी नातवंडे आहेत


ब्रॅण्ड 'Asha's'

आशाताईंनी 2002 मध्ये दुबईत आपले पहिले रेस्टॉरंट सुरू केले. आज ही एक आंतरराष्ट्रीय चेन असून दुबई, कुवेत, बहारीन, कतार यांसारख्या आखाती देशांसह युनायटेड किंगडममध्येही (बर्मिंगहॅम, मँचेस्टर) तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

हे रेस्टॉरंट प्रामुख्याने उत्तर भारतीय पाककृतींसाठी प्रसिद्ध आहे. आशाताईंना स्वतःला स्वयंपाकाची प्रचंड आवड असून, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक रेसिपीज आणि मसाले या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये समाविष्ट केले आहेत.

स्वरसाधिकेचा सन्मान

1981 : ‌‘उमराओ जान‌’ चित्रपटातील गाण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1997 : उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या 'Legacy' या अल्बमसाठी, ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या आशा भोसले या पहिल्या गायिका ठरल्या.

2000 : दादासाहेब फाळके पुरस्कार

2001 - फिल्मफेअर लाईफटाईम अचीव्हमेंट ॲवॉर्ड

2003 : संगीतक्षेत्रातील कामगिरीसाठी स्वरालय येसूदास पुरस्कार

2008 : भारत सरकारचा ‌‘पद्मविभूषण‌’

2011 : सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

2018 : बंग बिभूषण सन्मान

2021 : महाराष्ट्रभूषण

सातासमुद्रापार घुमला आवाज

आशाताईंनी 1991 साली ब्रिटीश पॉप स्टार बॉय जॉर्जसोबत 'Bow down Mister' हे गाणे गायले.

1997 मध्ये, ब्रिटिश बॅण्ड कॉर्नरशॉपने त्यांच्या ‌‘ब्रिमफुल ऑफ आशा‌’ या गाण्याद्वारे आशा भोसले यांच्या सांगीतिक कारकिदला मानवंदना दिली.

अमेरिकेतील सुप्रसिद्ध बॅण्ड क्रोनोस क्वार्टेटसोबत आशाताईंनी 'You've Stolen My Heart' (2005) हा अल्बम रेकॉर्ड केला. हा आशाताईंच्या कारकिदतील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय प्रयोग मानला जातो.

2026 मध्ये भोसले ब्रिटिश व्हर्च्युअल बॅण्ड ‌‘गोरिल्लाझ‌’च्या नवव्या स्टुडिओ अल्बम ‌‘द माऊंटेन‌’मधील ‌‘द शॅडोई लाईट‌’ या ट्रॅकवर झळकल्या.

स्वरसम्राज्ञीचे अष्टपैलुत्व

आवाजात अत्यंत लवचिकता आणि कोणत्याही प्रकारच्या गाण्याला सहज अनुरूप होणारा.

गाण्याच्या आशयाप्रमाणे आवाजातील भावछटा बदलण्याची विलक्षण क्षमता.

कोमल, खट्याळ, विरहयुक्त असे प्रत्येक भाव ओळखून, त्यानुसार गाण्याची विलक्षण हातोटी.

गझल, भजन, लोकसंगीत, पाश्चात्य शैली, कॅब्रे, पॉप अशा सर्वच प्रकारांवर समान प्रभुत्व.

विविध भाषांमधील गाण्यांतील उच्चार शुद्ध आणि स्पष्ट करण्यावर भर.

शब्दांच्या सूक्ष्म अर्थछटांचा विचार करूनच, गाण्याचे अर्थपूर्ण सादरीकरण.

गुंतागुंतीच्या तालरचनांवरही आशाताईंचे सहज प्रभुत्व.

आवाजाची पट्टी, पोत बदलण्याची अद्वितीय कला.

प्रत्येक गाण्याला आणि पात्राला अनुरूप अशी वेगळी स्वरछटा निर्माण करण्याचे कसब.

परंपरागत चौकटी मोडून नवे प्रयोग स्वीकारण्याची तयारी.

पाश्चात्य वाद्यमेळ व इतर शैलींचा प्रभाव यशस्वीपणे आत्मसात करणे.

बदलत्या काळानुसार बदल स्वीकरणे.

पडद्यावरील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत गायनशैली.

शास्त्रीय संगीताचे सर्वोच्च ज्ञान पाया असूनही, सादरीकरण सर्वसामान्यांना भावणारे.

आशाताईंचा राष्ट्रभक्तीचा स्वर :

देश हा देव असे माझा

बलसागर भारत होवो (समूहगीत)

ये धरती है हिंदुस्तान की

दे दी हमे आझादी

सारे जहाँ से अच्छा

भाषेपलीकडची ‌‘आशा‌’

1958 साली आशाताईंनी ‌‘हिज मास्टर्स व्हॉईस‌’ या लेबलखाली आपले पहिले बंगाली गाणे गायले. या गाण्यांना सुधीन दासगुप्ता आणि बिनोद चट्टोपाध्याय यांनी संगीत दिले होते.

‌‘मेलो मेलो रे मार्गदो‌’, ‌‘जय आद्य शक्ती‌’ अशी अनेक गुजराती गीतंसुद्धा आशाताईंनी गायली

1969 साली भूपेन हजारिका यांनी दिग्दर्शित केलेला आसामी चित्रपट ‌‘चिक मिक बिजुली‌’ या चित्रपटासाठी आशाताईंनी गाणी गायली.

मणिरत्नम यांच्या ‌‘इरुवर‌’ (1997) या तामिळ चित्रपटासाठी ‌‘वेनिला वेनिला‌’ हे गाणं गायले. यात त्यांनी Jazz शैलीचा वापर अतिशय कौशल्याने केला आहे.

1980 आणि 90च्या दशकामध्ये नेपाळी संगीतकार रणजित गझमेर आणि गायक नारायण गोपाळ यांच्यासोबत नेपाळी चित्रपटांसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.

अष्टपैलू गायिका

आशा भोसले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत लावणी, भावगीते, भक्तिगीते आणि कोळीगीते अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला आहे.

‌‘बुगडी माझी सांडली गं‌’ आणि ‌‘दिसला गं बाई दिसला‌’ या लोकप्रिय लावण्यांमधून आपल्या आवाजाचे वेगळेपण जगाला दाखवून दिले.

आर. डी. बर्मन आणि ओ. पी. नैय्यर या दोन महान संगीतकारांसोबत आशाताईंनी हिंदी संगीताला एक आधुनिक ओळख दिली. ‌‘दम मारो दम‌’, ‌‘पिया तू अब तो आजा‌’ आणि ‌‘आओ हुजूर तुमको‌’सारख्या गाण्यांनी त्यांना ‌‘क्वीन ऑफ इंडिपॉप‌’ आणि ‌‘व्हर्सटाईल सिंगर‌’ म्हणून प्रस्थापित केले.

‌‘उमराव जान‌’ चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‌‘दिल चीज क्या है‌’ आणि ‌‘इन आँखों की मस्ती के‌’ या गझल त्यांच्या कारकिदतील मैलाचा दगड ठरल्या. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

आशाताईंचा आवाज अत्यंत लवचिक असल्याने त्यांनी अगदी शास्त्रीय गाण्यांपासून ते पाश्चात्य ढंगाच्या गाण्यांपर्यंत सर्व काही लीलया पेलले. ‌‘रंगीला रे‌’सारख्या गाण्यातून त्यांनी वयाच्या 60व्या वषही आपल्या आवाजातील ताजेपणा सिद्ध केला.


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.