मुंबई : (Vande Bharat) केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू ते मुंबईदरम्यान नव्या वंदे भारत (Vande Bharat) स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे. या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते केएसआर बंगळूरू दरम्यान ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Vande Bharat)
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पी सी मोहन यांना पाठवलेल्या पत्रातून याबद्दल अधिकृत महिती समोर आली आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे मुंबई ते बंगळुरूदरम्यान अंतर एका रात्रीत पार होणार असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेकडून ही रेल्वे गाडी हाताळण्यात येणार असल्याची शक्यता आहे.(Vande Bharat)
या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेंगळुरू येथील केएसआर बेंगळुरू स्टेशन दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार. या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक मोठा आणि परिवर्तन घडवणारा निर्णय ठरणार आहे. वंदे भारतच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि वेगामुळे आता प्रवास हा केवळ गंतव्यस्थानी पोहोचण्यापुरता मर्यादित न राहता, तो स्वतः एक आनंददायी अनुभव ठरणार आहे".(Vande Bharat)
दरम्यान, दि.५ एप्रिल २०२६ रोजी बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी.सी मोहन यांना लिहिलेल्या पत्रात, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केएसआर बेंगळुरू रेल्वे स्टेशन आणि सीएसएमटी दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर सेवेला मान्यता देण्याची घोषणा केली होती. २०२६च्या सुरूवातीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन वाढवण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. त्याप्रमाणे २०२६च्या अखेरीस १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील. या ट्रेनच्या प्रत्येक बाजूला सहा डबे असतील.(Vande Bharat)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.