वारकरी संप्रदाय बाबत पवार यांचा लेख अत्यंत चुकीचा - देवेंद्र फडणवीस
12-Apr-2026
Total Views |
मुंबई :(Devendra Fadnavis)"वारकरी संप्रदाय बाबत शरद पवार यांचा लेख अत्यंत चुकीचा आहे.मला दुःख आहे की शरद पवार यांनी अशा प्रकारचा लेख लिहिला.शरद पवार यांचा पिंड निधर्मी आहे ,ते धर्म मानत नाहीत असे त्यांनी अनेक वेळा कबूल केले आहे.त्यामुळे वारकरी संप्रदाय संदर्भात त्यांच्याजवळ योग्य माहिती नसावी.
मध्यंतरी असा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायात काही लोक शिरून जो वारकरी विचार आहे त्याच्या विरुद्ध विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते. अशा लोकांना वारकरी संप्रदायाने बाहेर काढले. ज्या लोकांना वारकरी संप्रदायाने झिडकारले त्या लोकांचा संबंध आम्हाला अर्बन नक्षलवादाशी पाहायला मिळाला. त्या संदर्भातील डोझियर देखील माझ्याकडे आहे.वारकरी संप्रदायाची हजारो वर्षाची समृद्ध परंपरा आहे. वारकरी विचार हा श्रद्धेचा,बंधुतेचा विचार आहे.भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक व्यक्तीच्या मनाची शुद्धता झाली पाहिजे असा विचार करणारा, पर्यावरणाशी साधर्म्य साधणारा असा विचार आहे." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी शनिवार दि.११ रोजी दिल्ली येथे केले.(Devendra Fadnavis)
"प्रत्येकाला आपले मत अभिव्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही साहित्य संमेलनात वेगवेगळी मते येत असतात. महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री म्हणून देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून तसेच एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान आहे म्हणून त्यांचा लेख घेतला. पण त्यात काय लिहाव हा त्यांचा प्रश्न आहे. वारकरी विचाराच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायात विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देतो." असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.(Devendra Fadnavis)