दरवाजे असलेली नवी लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर

New Local Train with Doors : मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवासाची नवी दिशा

    12-Apr-2026
Total Views |
LOCAL WITH DOORS
 
मुंबई :(New Local Train with Doors) मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने चेन्नई येथील ईंटेग्रेल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात नॉन एसी दरवाजे असणारी नवीन लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर दाखल होईल. या नवीन लोकलमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि संरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे आयसीएफने एक नवीन लोकल बनवली आहे. ज्याच्यामध्ये दरवाजे बंद होण्याची सोय आहे. या लोकलचा मध्य रेल्वे मुंबईच्या दिशेने प्रवास हा चालू झालेला आहे. या लोकलच्या मध्ये तीन नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली सुविधा म्हणजे ज्याच्यामध्ये लोफर असलेले दरवाजे आहेत. जवळजवळ दोन तृतीयांश भाग हा लोफरच्या दरवाजाने बनवलेला आहे आणि एक तृतीयांश भागामध्ये काचेचे दरवाजे आहेत. याच्या माध्यमातून प्रवाशांना आपण कुठल्या स्थानकापर्यंत पोहोचलो आहोत याची माहिती मिळू शकेल.(New Local Train with Doors)
  
या नव्या लोकलमध्ये व्हेस्टिब्युल म्हणजे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. या गाडीला सहा कोचमध्ये आपण विभागू शकतो. सहा कोचच्या दोन भागामध्ये आपण याचे व्हेस्टिब्युल आहेत. यामुळे एकाच डब्यात होणारी गर्दी टाळून नागरिकांना एका डब्यातून सहज दुसऱ्या डब्यात जाता येईल. याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये छतावरती एक संयंत्र लावण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून रूफ माऊंटेड व्हेंटिलेशन सिस्टिम ज्याच्या माध्यमातून आपण डब्यातील हवा खेळती राहील. यामुळे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही असा प्रयत्न आपण करतो आहोत.(New Local Train with Doors)
 
हेही वाचा :  Mumbai local megablock: रविवारी मुंबई लोकल ठप्प! ‘या’ वेळेत ट्रेन नाही, प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
 
ही लोकल(New Local Train with Doors) आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आरडीएसओच्या माध्यमातून सीओसीसीआर ट्रायल करण्यात येतील. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर या ट्रेनची प्रवाशांसाठीच्या आवश्यकता लक्षात घेण्यासाठी विशिष्ट चाचण्या होतील. ज्याच्यामध्ये प्रवाशांना यामध्ये चढण्या उतरण्यास काही त्रास होतो का? किंवा दरवाजे बंद होण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत का? किंवा दरवाजे बंद केल्यानंतर प्रवाशांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय का? याच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांचा अहवाल आयसीएफला दिला जाईल. कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळून न आल्यास ही लोकल लगेचच प्रवाशांच्या सेवेमध्ये णनयत येईल असेही मध्य रेल्वेने सांगितले. तसेच, काही त्रुटी आढळून आल्यातर तात्काळ बदल करून योग्य ती काळजी घेऊन आणि बदल करून नवीन रेक हा मुंबईतील प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरात लवकर आणण्यात येतील.(New Local Train with Doors)