‘लव्ह जिहाद’! हा एक जिहाद घडवण्यासाठी, जिहादी ‘लॅण्ड जिहाद’ ते ‘ड्रग्ज जिहाद’ ते आता ‘कॉर्पोरेट जिहाद’चाही वापर करत आहेत. पण, हे कॉर्पोरेट स्तरावरच होते का? तर तसे नाही. एखाद्या विषारी किड्याने जिथून मार्ग मिळेल तिथून आत जावे आणि सगळा परिसर उद्ध्वस्त करावा तसेच हे आहे. हे जिहादी जिथे असतील तिथून प्रत्येक स्तरावरील सर्व शक्यतांचा वापर करत, ‘लव्ह जिहाद’ करत आहेत. नुकताच उघडकीस आलेला नाशिकचा ‘कॉर्पोरेट जिहाद’ हे त्याचेच उदाहरण. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘कॉर्पोरेट जिहाद’चा घेतलेला मागोवा...
आपला उगीच समज असतो की, गरीब, अज्ञानी आणि जगओळख नसलेले मुस्लीमच धर्मांध असतात आणि ते ‘जिहाद’ वगैरेसाठी काहीही करतात. शिकलेले लोक, सुधारलेले असल्याने असे काही करत नाहीत. पण, नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ने ही सगळी अफवा असल्याचे सिद्ध केले आहे.
ते सगळे इंजिनिअर आणि अगदी कॉर्पोरेट स्तरावरचे आधुनिक राहणीमान असणारेच होते. पण, त्यांनाही नुकतेच पोलिसांनी अटक केली. त्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या हिंदू महिला-पुरुष कर्मचाऱ्यांना ‘नमाज’ पढायला लावणे, हिंदू देव-देवतांची टिंगल करणे, निंदा करणे, अपमानास्पद बोलणे, मुद्दाम धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग करणे आणि धर्मांतरणासाठी दडपण आणणे असे गुन्हे केले होते. ते सगळे टीम लीडर होते, वरिष्ठ अधिकारीही होते. दानिश शेख, तौसिफ अख्तार, निदा खान, शफी शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी वगैरे हे ते आरोपी, शिकलेले आणि बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारे गुन्हेगार ठरले. त्यांना पाहून कुणालाही वाटेल की, अरे हे असे कसे करू शकतात? पण, सत्यपरिस्थिती हीच आहे की, धर्मांध समाजविघातकांनी सुशिक्षित आणि ज्यांच्यावर संशय येणार नाही, अशा लोकांनाच कटकारस्थानात सहभागी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. मागे दिल्लीत आत्मघातकी हल्ला झाला, त्यातले गुन्हेगार तर डॉक्टर होते. आताही नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील जे आठ टीम लीडर आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, हे सगळेच इंजिनिअर आहेत.
गेली अनेक वर्षे त्यांचे ‘लव्ह जिहाद’चे कटकारस्थान ‘सुखेनैव’ सुरू होते. गरीब घरच्या मुलींना नोकरीचे आमिष द्यायचे, त्यांची गरिबी आणि गरिबीतून आलेली लाचारी असाहाय्यता हेरायची आणि त्यांना नोकरी द्यायची. आपण तिचे हितचिंतक आहोत, तसेच तिच्या कामामध्ये काही चुका झाल्यास तिला सांभाळून घेऊ, अधिकचा ओव्हरटाईम देऊन तिला जास्त पगार कसा मिळेल हे बघू, असे सांगत ते त्या मुलींशी जवळीक साधायचे. गरीबच काय; पण सधन घरच्या मुलींनाही वाटायचे की, “अरे वा, आपल्याला नोकरी दिली. आता आपली कमाई वाढवण्यासाठीही हा टीम लीडर आपल्याला मदतदेखील करतो. आपल्याला विशेष आणि जवळचे मानतो.” त्यातूनच मुलींची त्यांच्याशी जवळीक व्हायची. मग मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यासाठी हे राक्षस पुढे सरसवायचे. त्या टीम लीडरची एकी तर पाहा. ते सगळे मुस्लीम होते आणि मिळूनच तिथल्या हिंदू मुली-महिलांच्या धार्मिक भावना दुखावायचे. त्या टीम लीडर्सपैकी कुणाच्याही मनात आले नाही की, आपण या महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहोत, त्यांना त्रास देत आहोत. उलट, त्यांच्यासाठी ते पुण्याचेच काम असणार!
या हिंदू कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण केले की, कयामतच्या रात्री आपल्यासकट आपण सांगू त्याचे पाप धुतले जाईल आणि आपल्याला जन्नत मिळेल, याच विचारात ते धुंद होते. ना कसली भीती, ना कसले बंधन! या मुली-महिलांनी या कंपनीच्या ‘एचआर’कडेही याबाबत तक्रार केली होती. पण, या कर्मचाऱ्यांना न्याय दिला गेला नाही. ही घटना उघडकीस कशी आली, तर अतिशय आधुनिक असलेली ती युवती त्या कंपनीत कामाला लागली. काही महिन्यांतच तिचा पेहरावच बदलला. जीन्स-मिडी-शॉर्ट टॉप घालणारी ती मुलगी आता सलवार-कुर्ता, तसेच मुस्लीम महिला ज्या पद्धतीने पेहराव करतात त्या पद्धतीने पेहराव करू लागली. घरातल्यांना वाटले, मुलगी मल्टी-नॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे, त्यामुळे तिच्या पोशाखात बदल झाला असेल. पण, तिने कट्टर धार्मिक मुसलमानांसारखे, एक महिना ‘रोजा’चे उपवास पकडले आणि घरातल्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हिंदू घरातील हिंदू-संस्कार झालेली आपली मुलगी, मुसलमान रूढी-प्रथा कशा पाळू लागली? घरातल्यांनीं तिला विश्वासात घेतले. प्रेमाने; पण कसून चौकशी केली, तेव्हा सत्य उघडकीस आले की, कंपनीतल्या टीम लीडर्सनी त्या कामाच्या ठिकाणाला ‘लव्ह जिहाद’चा अड्डा केला होता, जणू कटच केला होता.
हिंदू कर्मचाऱ्यांनी मुस्लीम पद्धतीने तिथे वावरावे, जगावे, मुस्लीम श्रद्धा बाळगाव्यात, यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जाई. पुढे हे प्रकरण पोलिसात दाखल झाले आणि पोलिसांनी नियोजन केले. महिला पोलिसांनी पाळत ठेवली. 40 ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासल्यानंतर, मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा एक, विनयभंगाचे चार, धार्मिक भावना दुखावत विनयभंगाचे तीन असे एकूण आठ गुन्हे नोंदवण्यात आले. याप्रकरणी आठ महिला, तर एक पुरुष तक्रारदार आहे. बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे. बळजबरी धर्मांतर केलेल्या संबंधित तरुणाचे, संशयित आरोपीसोबतचे डोक्यावर गोल टोपी घातलेले फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
असो, ही घटना उघडकीस आली म्हणून! पण, जरा डोळे उघडून पाहिले तर काय दिसते? कॉल सेंटर, आजूबाजूची गारमेंट किंवा पॅकिंग किंवा इतर कंपन्या पाहा, मॉल किंवा शॉपिंग सेंटर पाहा, तिथे वरिष्ठ स्तरावर टीम लीडर कोण आहे ते पाहा आणि त्याच्या हाताखाली काम करणारे कोण आहेत ते देखील पाहा. शाहरुख-सलमान-सैफ सारखे हातवारे करत, डोळ्यांची हालचाल करत चांगली हिंदी बोलता येते किंवा वरिष्ठांची मज राखत, त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवण्याचे कसब असते म्हणून किंवा येणाऱ्या ग्राहकांशी मधाळ आणि ‘जी-जी’ करून बोलण्याची पद्धत असते म्हणून तिथे असतात. यामध्ये टीम लीडर म्हणून जास्तीत-जास्तपणे कोण व्यक्ती असतात? दुसरीकडे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मुली-महिला, खरेच अतिशय गरीब घरच्या आणि परिस्थितीने गांजलेल्या असतात. (अपवाद वगळता)त्यांच्याशी कसे वागले जात असेल? धर्मांध लोकच का टीम लीडर्स होतात? किंवा हाताखाली गोरगरीब हिंदू असतील तिथे ते वरिष्ठ म्हणून कसे पोहोचतात? तर त्या स्तरावर पोहोचलेच पाहिजे आणि का पोहोचले पाहिजे? याबाबतचा त्यांचा हेतू स्पष्ट आणि ठाम असतो. तिथेपर्यंत ते पोहोचावेत म्हणून, त्यांना मदत करणारी एक सपोर्ट सिस्टम असते. अर्थातच, पुरोगामी स्वतःच्या हिंदू धर्माची ओळख विसरलेेले आणि छोट्या-मोठ्या आमिषाने खूश होणाऱ्या, काही स्वाथ हिंदूंची यात मोलाची भूमिका असते. “आम्ही धर्म मानत नाही, आम्हाला कामाशी काम. जो आम्हाला काही देईल आम्ही त्याचेच ऐकू. आमचा फायदा झाला आणि दुसऱ्याचे नुकसान झाले, तर आम्हाला काही देणेघेणे नाही,” अशी भूमिका असलेल्या काही हिंदूंमुळेच, हिंदू समाजाचे नुकसान होत आहे.
विषयांतर होईल; पण लिहायलाच हवे की, “राधा ने कान्हा से प्यार किया तो राधा ने पुछा की, कान्हा तू हिंदू हे, या मुसलमान?” तसेच, “मी एकटीने थोडीच मुसलमान व्यक्तीशी लग्न केले, करीनाने सोनाक्षी सिन्हाने पण मुसलमान पुरुषांशी लग्न केले. मग मी केले तर काय झाले,” असे म्हणणारी मोनालिसा अल्पवयीन आहे, असे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. खरेतर तिने फरमान खानशी केलेला विवाह म्हणजे, ‘लव्ह जिहाद’ला सपोर्ट सिस्टम कसे काम करते याचे उत्तम उदाहरण ठरावे. ती अल्पवयीन असूनही ती सज्ञान आहे असा दावा करणे, तिच्या तोंडून हिंदूंच्या देव-देवतांचा उच्चार करवून घेणे, सुंदर, अतिश्रीमंत, मोठमोठ्या घरच्या अभिनेत्रीही मुस्लिमांशी विवाह करतात, म्हणजे तसे करणे चांगलेच आहे असे मोनालिसाच्या तोंडून वदवणे, केरळम्च्या कम्युनिस्ट सरकारच्या मंत्र्यांनी तिच्या विवाहाला हजर राहणे, या सग्ाळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या गोष्टष्टे अगदी तशाच जोडलेल्या आहेत, जसे ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ ते ‘कॉपोरेट जिहाद’ एकमेकांशी जोडलेले आहेत. तलवारीच्या आणि शस्त्राच्या धाकदपटशाच्या माध्यमातून हिंदूंना या देशात अल्पसंख्याक करता येणार नाही, म्हणून त्यांनी रचलेल्या या असंख्य षड्यंत्रांना आपण कसे थांबवणार आहोत? ‘आपल्या घराबाहेर काहीही होवो, आम्हाला काय करायचे; मरू दे तिकडे’ ही वृत्ती जोपर्यंत आपण सोडत नाही आणि सकल हिंदू म्हणून जोपर्यंत संघटित होत नाही, तोपर्यंत अशाप्रकारचे हजारो ‘जिहाद’ दररोज उघड होतच राहणार! हिंदू तेज जागा रे!
9594969638