मुंबई: (Worli Development) वरळी येथील प्रसिद्ध लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या खाली ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तसेच तरुणांसाठी ‘ओपन जिम’चा प्रस्ताव आहे. शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. (Worli Development)
एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास मंत्रालयाकडून हा निधी वर्ग करून घेतला आहे. या पुलाच्या दुसऱ्या बाजूला शीव कल्याण केंद्राने घर नसलेल्या मुलांसाठी जागेची मागणी केली होती. अशाप्रकारच्या कामाचा या संस्थेला पूर्ण अनुभव असून, उपनगरांमध्ये त्यांनी चांगले कामही केले आहे. (Worli Development)
याठिकाणी वरळीतील स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्रदेखील चालवले जाणार आहे. हे करीत असताना वर उल्लेखलेल्या विरंगुळा केंद्र किंवा ‘ओपन जिम’च्या आराखड्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, अकारण या सगळ्या विषयाला राजकीय रंग दिला जात असून, यात सर्वसामान्य वरळीकरांचे नुकसानच होणार आहे. अशाप्रकारे वरळीतील अनेक राखीव जागा दुरावस्थेत असून, अनेक मैदानांना कुलूपही लावलेले आहे. (Worli Development)