मुंबई : (Western Railway) पश्चिम रेल्वेवरील विरार - दादर १५ डबा जलद लोकलने भाईंदर येथील थांबा चुकविल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांनी पाठीमागून येणारी वातानुकूलित लोकल थांबवली आणि त्यातून प्रवास केला. लोकल थांबा चुकविणाऱ्या मोटरमनचे निलंबन करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
विरार येथून बुधवार, ८ एप्रिल रोजी सकाळी १०.४४ वाजता विरार दादर १५ डबा जलद लोकल सुटली. ही लोकल सकाळी ११.०१ वाजता भाईंदर स्थानकात येण्याची नियोजित वेळ होती. प्रवासी जलद लोकल पकडण्यासाठी फलाटावर उतरले. परंतु, लोकल भाईंदर येथे न थांबता पुढे निघून गेली. कार्यालयात जाण्याच्या धावपळीत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वे ((Western Railway) प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.(Western Railway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.