शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील अर्बन नक्षल्यांना बाहेर काढण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी - नवनाथ बन

    11-Apr-2026
Total Views |
navnath ban
 
मुंबई :(Sharad Pawar) "शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वारी आणि वारकरी संप्रदायात गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षलवादाची घुसखोरी वाढली होती. शरद पवारांनी आपल्या टीमला सांगून त्याबाबत संशोधन करावे. अर्बन नक्षल्यांना वारकरी संप्रदायातून कसे बाहेर काढावे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. देव,हिंदू धर्म आणि देशासाठी काम करणारा वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय हा प्रबोधन आणि भक्तीचा मार्ग असून त्याला धर्मांधतेशी जोडणे चुकीचे आहे.राज्यात वोट जिहाद,लव्ह जिहाद आणि लँड जिहादसारख्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज असताना दुर्दैवाने शरद पवार यावर बोलत नाहीत." असे प्रतिपादन भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.११ रोजी केले.
 
"विजय वडेट्टीवार यांना अल्पसंख्यांक तुष्टीकरणच दिसते.कारण काँग्रेसची मदार ही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे.राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत.खरात कोणत्या धर्माचा आहे यापेक्षा खरात प्रकरणात कारवाई ही भाजपा सरकारमुळेच शक्य झाली.काँग्रेस सत्तेत असती तर अशी कारवाई झाली नसती."असेही बन यांनी स्पष्ट केले.(Sharad Pawar)
 
"राहुरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न केले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासाठी संवाद साधला होता, मात्र विरोधकांनी राजकारणासाठी उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे." असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.(Sharad Pawar)
 
 
महिलाना सन्मान आणि संधी देणे हे भाजपचे धोरण असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महिलांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ३३% महिला आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Sharad Pawar)
"मुंबई महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विशेषतः नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी ए आय चा वापर करून घोटाळे रोखण्याचा प्रयत्न केला जाईल." असे बन यांनी स्पष्ट केले.(Sharad Pawar)
 
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात घराणेशाही नसून सामान्य कार्यकर्त्यांनाही मोठ्या पदांवर जाण्याची संधी मिळते हीच भाजपची ताकद असल्याचे बन यांनी अधोरेखित केले.(Sharad Pawar)
 
" सुनेत्राताई पवार यांच्या सुरक्षेबाबत आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल. तक्रार खोडसाळ आहे का याचाही तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल.तसेच महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला असून जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.तसेच जनजागृतीही महत्त्वाची आहे." असे बन यांनी नमूद केले.(Sharad Pawar)