मुंबई :(Rashtriya Swayamsevak Sangh) "भारताचे भविष्य हे युवांच्या विचारांवर, संस्कारांवर आणि कृतीवर अवलंबून आहे. युवा शक्ती ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. ज्या देशातील युवा जागरूक, संस्कारित आणि संघटित असतात, तो देश आपोआप विकास आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचतो”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरखपूर महानगर दक्षिण भागातर्फे संघ शताब्दी वर्षानिमित्त 'राष्ट्रनिर्माणात युवांची भूमिका' या विषयावर युवा संवाद नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोरक्ष प्रांत संघचालक डॉ. महेंद्र अग्रवाल आणि दिग्विजयनाथ स्नातकोत्तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश सिंह हे देखील उपस्थित होते. (Rashtriya Swayamsevak Sangh)
उपस्थितांना संबोधत अतुल लिमये म्हणाले, आज देशाला अशा युवांची गरज आहे, जे आपल्या करिअरमध्ये प्रगती करतानाच सामाजिक समरसता, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि राष्ट्रहितासाठी सक्रिय भूमिका निभावतील. सध्याचा काळ हा केवळ संधींचाच नाही तर जबाबदाऱ्यांचाही आहे. युवांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. राष्ट्रनिर्माणात (Rashtriya Swayamsevak Sangh) युवा शक्तीची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. युवांनी आपल्या जीवनात शिस्त, संस्कार आणि सेवेची भावना जोपासून समाज आणि देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे. आजचा काळ हा आव्हानांसोबतच अपार संधींचाही आहे, त्यामुळे युवांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
युवांना आत्मनिर्भर, शिस्तबद्ध आणि राष्ट्राप्रती समर्पित होण्याचा संदेश देत सांगितले की, केवळ वैयक्तिक प्रगती नव्हे तर समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीला जीवनाचे ध्येय बनवणे आवश्यक आहे. जर युवा आपल्या जीवनात शिस्त, सेवा आणि समर्पण या मूल्यांचा स्वीकार करतील, तर देशाला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. युवांनी केवळ वैयक्तिक यशापुरते मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.(Rashtriya Swayamsevak Sangh)
या कार्यक्रमात दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), मदन मोहन मालवीय प्रौद्योगिकी विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील युवक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.(Rashtriya Swayamsevak Sangh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक