महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन आणि मंत्रालयात अभिवादन
11-Apr-2026
Total Views |
मुंबई :(Mahatma Jotirao Phule)महात्मा जोतिराव फुले यांच्या द्वि-जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त शनिवार, दि.११ एप्रिल रोजी विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव शिवदर्शन साठ्ये व उप सचिव विजय कोमटवार, विधानपरिषदेच्या उपसभापतींचे यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.(Mahatma Jotirao Phule)
तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयातील महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह विजय शिंदे, निलेश हरड, अमोल चव्हाण आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.(Mahatma Jotirao Phule)