‘माझी मुंबई’ छायाचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीची संधी
11-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mazi Mumbai photography competition) मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित खुल्या छायाचित्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा करी रोड येथील त्रिवेणी संगम महापालिका शाळेत पार पडला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचे विविध पैलू कलात्मकदृष्ट्या टिपण्याची संधी मिळाल्याचे मत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छायाचित्रांमधून त्यांचा विकसित होत असलेला कलात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.(Mazi Mumbai photography competition)
या स्पर्धेत महापालिका विद्यार्थी गटात मोहम्मद नजीब महयुद्दिन याने प्रथम क्रमांक पटकावला, तर आकाश सहानी आणि आयेशा खान यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, २ हजार आणि दीड हजार रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच मार्तंड पितळे, विष्णू सहानी, अल्फिया अन्सारी, अनिकेत वर्मा आणि सूरज मौर्या यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.(Mazi Mumbai photography competition)
महापालिका कर्मचारी गटात अमोल पवार, प्रशांत कांबळे आणि शाहीन शेख यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला, तर दिनेश रिकामे, संतोष यादव आणि उज्ज्वला जाधव यांना उत्तेजनार्थ सन्मानित करण्यात आले. खुल्या गटात विजयकुमार गोहिल, संजय शुक्ला आणि मंथन तांबे यांनी अव्वल स्थान मिळविले असून, सायली मडकईकर, दर्शन माळी आणि सचिन गोपाळ भरणकर यांनाही उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले.(Mazi Mumbai photography competition)