मुंबई : (Chhagan Bhujbal)अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शनिवार दि.११ रोजी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले.भुजबळ हेलिकॉप्टरने नाशिकवरून कार्यक्रमास जाताना खानवडी,तालुका पुरंदर येथे ही घटना घडली.पायलटने हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवले.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे खानवडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमास जात असताना ही घटना घडली आहे. पायलटच्या चुकीने हे कृत्य झाले असून यामुळे पुन्हा एकदा महत्त्वाच्या व्यक्तींच्या उड्डाण प्रवासातील त्रुटींवर प्रश्न निर्माण झाले आहेत.(Chhagan Bhujbal)