हरियाणातील ‘अल-फला’ नावाच्या विद्यापीठातील डॉक्टर मंडळी रुग्णांची सेवा करण्याऐवजी भारतात बॉम्बस्फोट घडविण्याचे कट आखत असल्याचे गतवर्षी उघड झाले. आता महाराष्ट्रातील नाशिकसारख्या शहरात एका प्रख्यात ‘आयटी’ कंपनीतील उच्चशिक्षित नोकरदारांनी आपल्या काही महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि एका तरुणाचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा आणि त्यातील ‘लव्ह जिहाद’ हे सगळे कदापि थोतांड नसून वास्तव आहे, हे नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे.
भारतात आपली लोकसंख्या वाढवून राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्मांध मुस्लिमांकडून जे विविध मार्ग चोखाळले जात आहेत, त्यात ‘लव्ह जिहाद’ हा मार्ग सर्वात यशस्वी होताना दिसतो. या ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे प्रथम केरळम् या राज्यातून उघड होत गेली. आता त्याचे लोण महाराष्ट्रातही आल्याचे नाशिकमधील नुकत्याच उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने दाखवून दिले. नाशिकमधील एका प्रख्यात ‘आयटी’ कंपनीतील सात-आठ तरुण मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि कंपनीतील एका तरुणाचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे एका तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे.
हिंदू तरुणींना आपल्या प्रेमपाशात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे, नंतर त्यांना त्यावरून ‘ब्लॅकमेल’ करायचे आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांचे धर्मांतर करायचे, असे ‘लव्ह जिहाद’चे भीषण स्वरूप. त्यासाठी मुस्लीम तरुणांना स्थानिक मशिदींकडून सढळ हस्ते आर्थिक मदत केली जाते. हे तरुण आपली खरी ओळख लपवून या तरुणींना आपण हिंदू असल्याचे भासवितात. एकदा का या तरुणी त्यांच्या प्रेमपाशात पूर्णपणे गुरफटल्या की, त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते. परिणामी, या मुली आपल्याच पालकांच्या विरोधात जाऊन मुस्लीम तरुणांशी लग्न करतात आणि नंतर काही काळातच पूर्णपणे पस्तावतात. पण, तोपर्यंत व्हायचे ते नुकसान झालेले असते. यापूवही अशी एक ना अनेक उदाहरणे आपण ऐकली, वाचली आणि पाहिली आहेतच.
पण, यानिमित्ताने ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार केरळम् व अन्य राज्यांत असेल, महाराष्ट्रात तसे काही घडत नसेल, या समजुतीला या घटनेने मोठा धक्का दिला. हा प्रकार उघड झाला म्हणून लोकांच्या नजरेत आला. पण, लोकलज्जेस्तव अशी अनेक प्रकरणे उजेडातच येत नाहीत. त्यामुळे नाशिकमधील घटनेकडे एक अपवाद म्हणून न पाहता, आता अशाप्रकारच्या घटना अन्यत्रही होत आहेत का, याचा शोध घेतला गेला पाहिजे. काही महिन्यांपूव ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची कथा ही केरळम्मधील ‘लव्ह जिहाद’च्या सत्यघटनांवर आधारित होती. भारतातील सेक्युलर राजकीय नेत्यांनी आणि कथित पुरोगामी बुद्धिजीवींनी तो प्रचारकी थाटाचा चित्रपट असल्याची टीका केली. पण, ‘लव्ह जिहाद’ हे वास्तव आहे, हे यापूवच सिद्ध झाले आहे. आता त्याची धग महाराष्ट्रालाही लागत असल्याचे दिसून येत असून, राज्य सरकारने तत्काळ सजगतेने तपास केला पाहिजे. नाशिकमधील घटनेला व्यावसायिक वर्चस्वाचाही पैलू आहे का, याचाही तपास झाला पाहिजे.
काही प्रमाणात हिंदू पालक हे आपल्या मुलींवर पुरेसे धार्मिक संस्कार करण्यात कमी पडतात, हे खेदाने नमूद करावे लागेल. सुखवस्तू राहणीमानाला प्राधान्य देताना हिंदू मध्यमवर्गाने धार्मिक बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष केल. कारण, हिंदू धर्मातील अनेक प्रथा, सण-उत्सव, तसेच धार्मिक कार्ये यावर मुस्लीम तरुणांकडून टीका केली जाते, तेव्हा त्यांच्या टीकेचा तर्कसंगत प्रतिवाद करण्यात या मुली कमी पडतात. कारण, त्यांना हिंदू धर्म आणि त्यातील प्रथा-रिवाज यामागील शास्त्रच ठाऊक नसते. अनेक तरुण हिंदू युवक-युवतींना देवाचे एकही स्तोत्र तोंडपाठ नसते. एखादी पूजा, धार्मिक कार्य किंवा संस्कार का केला जातो, त्याची माहिती नसते. हिंदू धर्मातील कोणती गोष्ट शब्दश: स्वीकारायची आणि कोणती प्रतीकात्मक, हेच त्यांना ठाऊक नसते. या स्थितीत मुस्लीम तरुणांकडून त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ सहज केले जाते. नंतर याच मुली आपल्याच पालकांशी हिंदू धर्मातील रूढी आणि सणांविरोधात वाद घालताना दिसतात.
गतवष हरियाणातील ‘अल-फला’ या विद्यापीठातील काही डॉक्टर हे भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट आखत असल्याचे उघड झाले होते. त्यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचा वापर केला होता आणि भरपूर प्रमाणात स्फोटक साहित्य जमविले होते. यातील एक जिहादी डॉक्टर दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणण्यात यशस्वी ठरला. सुदैवाने त्याच्या बहुसंख्य साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण, यातून एक गोष्ट उघड झाली की, धर्मांध मुस्लीम हे कितीही उच्चविद्याविभूषित असले, तरी त्यांच्या मनावर धर्मांधतेचे जे आवरण पसरले असते, तेच शेवटी निर्णायक ठरते. आता महाराष्ट्रात ‘आयटी’सारख्या उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनीतील हे मुस्लीम तरुणही धार्मिक उन्मादाने ग्रस्त होते. आपल्या व्यावसायिक कारकिदपेक्षा ‘लव्ह जिहाद’सारख्या कारवाया करण्यास ते प्राधान्य देत होते.
महाराष्ट्रात नुकताच धर्मांतरविरोधी कायदा केला असून, त्यात कठोर तरतुदीही केल्या आहेत. पण, आपलेच नाणे खोटे असेल, तर इतरांना दोष देऊन काय उपयोग? हिंदू समाजाने आता अधिक जागरूक राहून आपल्या पाल्यांवर योग्य ते धार्मिक संस्कार करण्याची गरज आहे. धार्मिक कार्ये आणि कर्मकांडे हे मागासलेपणाचे लक्षण नसून, ती आपली खरी सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख असल्याचा दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. किंबहुना, हिंदू हा जगातील सर्वात वैज्ञानिक वा तर्कशुद्ध धर्म आहे, हे आपल्याच मुला-मुलींना समजावून सांगितले पाहिजे. तसेच अशाप्रकारे समाजात, कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार, धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणण्याचे प्रकार सुरु असतील, तर महिलांनी न घाबरता वाचा फोडायलाच हवी. कुटुंबीयांशी, मित्रमैत्रिणींशी संवाद साधावा. पोलिसांची मदत घ्यावी. प्रसंगी समुपदेशकांचीही याकामी मदत घेता येईल. पण, अशा धर्मांध, जिहादी मनसुब्यांपासून अखंड सावध असावे.
दै.‘मुंबई तरुण भारत’च्या योगिता साळवी यांनीही राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात तरुणींच्या 200 हून अधिक सभा घेतल्या होत्या. तेव्हा महिलांना ‘लव्ह जिहाद’ हा नेमका काय प्रकार आहे, त्याची कल्पनादेखील नसल्याचे आढळून आले होते. त्यातच अशा घटनांमध्ये फक्त गरीब समाजातील मुली बळी पडत असतील, हेही आता नाशिकच्या घटनेने खोटे असल्याचे दाखवून दिले. ‘आयटी’सारख्या उच्चशिक्षित क्षेत्रातील महिलाही ‘लव्ह जिहाद’,‘कॉर्पोरेट जिहाद’च्या या मायावी सापळ्यात अलगद फसत असतील, तर त्याविरोधात जनजागृतीची आपल्याला किती नितांत गरज आहे, ते लक्षात यावे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्यानंतर कायद्याचा आधार घेण्यापेक्षा मुळातच आपल्या मुला-मुलींना हिंदू धर्मातील योग्य प्रथा, त्याची उदात्त तत्त्वे आणि त्यामागील शास्त्र यांची ओळख करून दिली, तर अशी प्रकरणे घडणारच नाहीत. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ हे वचन सत्य आहे. हिंदूंमधील नव्या पिढीला धार्मिक शिक्षण देणे, ही म्हणूनच आता काळाची गरज!