मुंबई : (Change of Guard) शहरी प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत, बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एआय-आधारित प्रगत सुविधा सुरू करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश मंजुरी प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे असून, ‘इज-ऑफ-डूइंग-बिझनेस’मध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
नरेडकोच्या महाराष्ट्रच्या ‘चेंज ऑफ गार्ड’ (Change of Guard) या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी नरेडको महाराष्ट्रच्या सदस्यांना संबोधित केले. कार्यक्रमात बोलताना मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या,या एआय्-आधारित सुविधेचा परिचय मुंबईच्या रिअल इस्टेट परिसंस्थेतील प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन, आमचे उद्दिष्ट मंजुरीचा कालावधी कमी करणे आणि भागधारकांसाठी एकूण कार्यक्षमता सुधारणे हे आहे. प्रस्तावित प्रणालीद्वारे विकासक, वास्तुविशारद आणि सल्लागारांना रिअल-टाइममध्ये अर्ज सादर करणे व ट्रॅक करणे शक्य होईल. एआयच्या मदतीने कागदपत्र पडताळणी, नियमांचे पालन आणि अंदाजित विश्लेषण जलद होऊन मंजुरीतील विलंब कमी होणार आहे. (Change of Guard)
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले, “मुंबई रिअल इस्टेटमधील इज-ऑफ-डूइंग-बिझनेससाठी वेगाने एक मॉडेल शहर बनत आहे. आज, बांधकाम प्रस्तावांची मंजुरी पारदर्शकता आणि एंड-टू-एंड डिजिटलायझेशनमुळे ४५ दिवसांच्या आत दिली जात आहे. यामुळे केवळ विकासाला गती मिळत नाही, तर भागधारकांमध्ये विश्वास निर्माण होतो. आम्ही महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक शहरी वाढीसाठी वचनबद्ध आहोत आणि विकासकांना महिलांसाठी स्वच्छतागृहे यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.” (Change of Guard)
दरम्यान, नरेडको महाराष्ट्रच्या नेतृत्वात बदल झाला असून सृष्टी ग्रुपचे संस्थापक कमलेश ठाकूर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जय गोएंका सचिव तर मनन शाह खजिनदार म्हणून नियुक्त झाले. या नव्या नेतृत्वाने पारदर्शकता, डिजिटलायझेशन आणि शासकीय सहकार्यावर आधारित विकासाचा अजेंडा जाहीर केला. कार्यक्रमात ‘नरेडको वन’ हे डिजिटल ॲपही लाँच करण्यात आले, ज्यामुळे सदस्यांमधील संवाद आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होणार आहे. (Change of Guard)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.