विकास कामांसाठीचा सर्व पैसा खर्च करा- अर्थसंकल्पादरम्यान स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचना

Prabhakar Shinde : विकास कामांसाठीचा सर्व पैसा खर्च करा - अर्थसंकल्पादरम्यान स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचना

    10-Apr-2026
Total Views |
Prabhakar shinde
 
मुंबई :(Prabhakar Shinde) गुरुवारी महापालिका सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पामध्ये विकास कामांसाठी तरतूद केलेला सर्व निधी खर्च करण्याची सूचना त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.
 
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे(Prabhakar Shinde)यांनी हा अर्थसंकल्प गुरुवारी पालिका सभागृहात सादर केला. यावेळी शिंदे यांनी अर्थसंकल्पीय भाषणात विकास कामांसाठी तरतूद करण्यात येणाऱ्या निधीचा १०० टक्के वापर होत नसल्याकडे लक्ष वेधले.(Prabhakar Shinde)
 
अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी फक्त ७० ते ८० टक्के इतकाच निधी संबंधित विभागांकडून खर्च केला जातो. उरलेला निधि व्यपगत (लॅप्स) होतो. त्यामुळे २०२६-२०२७ मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचा पूर्ण विनियोग करण्यासंबंधी पुनर्विलोकन समिति गठित करण्यात यावी. तसेच विकास कामे मध्यवर्ती यंत्रणा किंवा विभाग कार्यालय यापैकी कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे हे निश्चित करण्यात यावे, अशी सूचना शिंदे यांनी यावेळी केली.(Prabhakar Shinde)
 
 गळती शोधून पाण्याचा अपव्यय कमी करणे, पाण्याचा दाब व प्रवाह यांचे व्यवस्थापन करणे. पाण्याची गळती, त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय ही कित्येक वर्षापासूनची मोठी समस्या आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी एक कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग समान पाणी पुरवठा करण्यासाठीही होईल. पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता प्रत्येक विभागवार कक्षास पुरेसा कर्मचारीवर्ग, साधनसामुग्री व यंत्रे पुरविण्यात यावीत, अशी सूचनाही शिंदे यांनी प्रशासनाला केली.(Prabhakar Shinde)
 
अनधिकृत नळ जोडण्याकडे लक्ष वेधले
 
मुंबई शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे अशा बांधकामांना खाजगी प्लंबर्सद्वारे अनधिकृत जलजोडण्या देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. अनधिकृत जलजोडणी घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात यावा. त्याचप्रमाणे, जलजोडणीसाठी असलेली प्रक्रीया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात यावी. जेणेकरुन, अनधिकृत जलजोडणी घेण्याच्या प्रकरणांना आळा बसेल, असेही शिंदे यांनी प्रशासनाला सुचवले.(Prabhakar Shinde)