शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;

    10-Apr-2026
Total Views |
ration distribution
 
मुंबई :(Gas Cylinder)मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. 
 
या मोहिमेत वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्यांसह ४५१ सिलेंडर असा एकूण ४०,६१,७१६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Gas Cylinder)
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, "जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील."(Gas Cylinder)
 
हेही वाचा :  विकास कामांसाठीचा सर्व पैसा खर्च करा- अर्थसंकल्पादरम्यान स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचना
 
या मोहिमेसाठी उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी), गणेश बेल्लाळे आणि उपनियंत्रक शिधावाटप (परिमंडळ 'अ'), माधुरी शिंदे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आणि स.शि.अ. प्रदीप यादव यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात सापळा रचण्यात आला.(Gas Cylinder)
 
या कारवाई पथकात भूपेंद्र गवळी, महेश देशपांडे, राहुल साळुंखे, अभिजीत गोराणे, विश्वजित गडकरी, नानासो रणदिवे, सचिन बोरसे, अनिकेत जवळकर, विकास उभे, जितेंद्र घोलप, नामदेव पडूळकर, राहुल कोळी, महेश होळकर आणि आशिष राऊत यांचा सहभाग होता.(Gas Cylinder)