मुंबई, दि. ९ :(Mumbai Metro Rail)मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो लाईन-३ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रवासी-अनुकूल निर्णय जाहीर केला आहे. शहरातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करत तसेच डिजिटल आणि संपर्करहित प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांसह पर्यटकांसाठी सवलतीचे प्रवास पास सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व पास केवळ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड द्वारेच उपलब्ध असतील, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि कॅशलेस होणार आहे.
या नव्या योजनेनुसार, इयत्ता १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ आणि ६० ट्रिप पासवर तब्बल २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. हे पास ३० दिवसांसाठी वैध असतील, ज्यामुळे नियमित शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.(Mumbai Metro Rail)
याशिवाय, मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठीही खास अनलिमिटेड प्रवास पास उपलब्ध करण्यात आले आहेत. एक दिवसासाठी ₹२८० आणि तीन दिवसांसाठी ₹७०० अशा दरात हे पास मिळणार असून, शहरातील विविध भागात मेट्रोने निर्बंधाविना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मुंबईची सफर अधिक सोपी आणि किफायतशीर होणार आहे.(Mumbai Metro Rail)
दरम्यान, एमएमआरसीने आधीपासूनच डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही सवलती लागू केल्या आहेत. मेट्रो कनेक्ट3 अॅप आणि एनसीएमसी कार्डद्वारे ४५ ट्रिप पासवर १० टक्के, तर ६० ट्रिप पासवर १५ टक्के सवलत दिली जात आहे. तसेच, दिव्यांग प्रवाशांसाठी ४५ आणि ६० ट्रिप पासवर सरसकट २५ टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे, जे या उपक्रमाच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे.(Mumbai Metro Rail)
या उपक्रमामुळे केवळ प्रवासाचा खर्च कमी होणार नाही, तर डिजिटल व्यवहारांना चालना मिळून मेट्रो प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि त्रासमुक्त होणार आहे. एमएमआरसीचा हा निर्णय मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक आधुनिक, परवडणारी आणि प्रवासी-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.(Mumbai Metro Rail)
मुख्य वैशिष्ट्येः
विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता १२वीपर्यंत):
४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% सवलत
पासची वैधताः ३० दिवस
पर्यटकांसाठी (अनलिमिटेड प्रवास पास):
१ दिवसः ₹२८०
३ दिवसः ₹७००
आधीपासून उपलब्ध सवलती (MetroConnect3 अॅप आणि NCMC कार्डवर) :
नियमित प्रवासीः
४५ ट्रिप पासवर १०% सवलत
६० ट्रिप पासवर १५% सवलत
दिव्यांग प्रवासीः
४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% फ्लॅट सवलत (Mumbai Metro Rail)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.