इंडियन स्किल स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पुरस्कार देणारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
10-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mangalprabhat Lodha) "इंडियन स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात मंत्री लोढा यांच्याहस्ते कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 'कौशल्याचार्य' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.(Mangalprabhat Lodha)
याप्रसंगी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यात सोसायटीचे आयुक्त डॉ अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यांच्याश अधिकारी आणि विजेते विद्यार्थी उपस्थित होते.(Mangalprabhat Lodha)
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "कौशल्य विकास विभागाने युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येणार आहे. सरकार केवळ कर्ज देऊन थांबणार नाही, तर प्रशिक्षणापासून ते मेंटरशिप, मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांवर तरुणांच्या पाठीशी उभे राहील," असे आश्वासन त्यांनी दिले.(Mangalprabhat Lodha)
"आज आपला महाराष्ट्र जीडीपी, परकीय गुंतवणूक, निर्यात, स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी मोठा आहे. मेहनत आणि कौशल्याची हीच खरी ओळख असून, युवा शक्तीच्या जोरावर आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू," असेही ते म्हणाले.(Mangalprabhat Lodha)