मुंबई : (Maha Vikas Aghadi) बारामती विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि उबाठा गटात खडाजंगी सुरु असून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाना पटोले आणि उबाठा गटाचे संजय राऊत यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
सगळीकडे बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी होत असताना काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून विधानसभा अध्यक्षपद सोडले नसते तर १५ वर्षे मविआची सत्ता राहिली असती, अशी टीका उबाठा गटाने सामनातील अग्रलेखातून काँग्रेसवर केली.(Maha Vikas Aghadi)
यावर नाना पटोले यांनी एक वर्ष ठाकरेंच्या सेनेने आणि राष्ट्रवादीने कुणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही, याचे उत्तर मागितले. तसेच काँग्रेसला आणि हायकमांडला जास्त बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास सगळी घटना जनतेसमोर आणण्याची वेळ त्यांनी आणू नये. आपल्यासोबत असलेल्या पक्षावर टीका करण्याची आमची भूमिका नाही. पण, जास्तच अती झाले तर हायकमांडची परवानगी घेऊन वास्तविकता समोर मांडू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर पटोले यांनी कालचा अग्रलेख वाचला आहे. आजचाही अग्रलेख आवर्जून वाचला पाहिजे. वाचनात सातत्य असेल तर, वैचारिक गोंधळ होत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.(Maha Vikas Aghadi)
राऊतांना त्यांच्याच पक्षात मान्यता नाही
दरम्यान, संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातच कुणी मान्यता देत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना मान्यता द्यावी, असे वाटत असल्यास आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, अशी टीका पटोलेंनी केली.(Maha Vikas Aghadi)
मविआची वज्रमूठ सैल
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच राऊत आणि पटोले यांच्यात उडत असलेले खटके सर्वपरिचित आहेत. आता राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते प्रकर्षाने पुढे आलेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील जुन्या वादाचा हा नवा अंक असल्याचे दिसते. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील(Maha Vikas Aghadi) घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि विश्वासाची कमतरता असल्याचे स्पष्ट होते. बारामतीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना, प्रत्यक्षात मात्र, विरोधी पक्षांमध्ये संघर्ष दिसत आहे. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी ते सार्वजनिक पातळीवर अशा प्रकारे व्यक्त झाल्यास आघाडीची एकजूट कमकुवत होते आणि यातून मविआची वज्रमूठ सैल झाल्याचे दिसते.(Maha Vikas Aghadi)
"बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत(Maha Vikas Aghadi) मोठा गोंधळ निर्माण झाला असून या गोंधळामुळे आघाडीतील विसंवाद पुन्हा समोर आला आहे. संजय राऊत काँग्रेसला सतत सल्ले देत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेसचे पर्यायी नेतृत्व आपणच आहोत, असा समज त्यांनी करून घेतला आहे."
- नवनाथ बन, मुख्य प्रवक्ते, भाजप (Maha Vikas Aghadi)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....