Nashik Corporate Jihad Case : नाशकात ‘कॉर्पोरेट जिहाद‘चा पर्दाफाश, ६ जण अटकेत; ८ महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरणाचा दबाव

कंपनीतील महिला कर्मचार्‍यांचा ४ वर्षांपासून छळ; संचालकांचे दुर्लक्ष, तपासासाठी ‘एसआयटी‘ची स्थापना

    10-Apr-2026
Total Views |
 
Nashik Corporate Jihad Case
 
नाशिक : (Nashik Corporate Jihad Case) नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद‘चा (Nashik Corporate Jihad Case) अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत, त्यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. याप्रकरणी आठ महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक पोलीस ठाण्यात विनयभंग, अत्याचार, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता, तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
या बहुराष्ट्रीय कंपनीत दोन विवाहित महिला आणि सहा तरुणी अशा आठ जणींचे लैंगिक शोषण केले जात होते. तसेच त्यांचा विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. हा गैरप्रकार २०२२ सालापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात नऊ ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, एका युवकाच्या तक्रारीचाही समावेश आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
अलीकडच्या काळामध्ये नाशिक हे मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणातील कंपनीचे नाव उघड न केल्याने इतरही कंपन्यांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाऊ लागले आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
कंपनी संचालकांवरही गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काम करणार्‍या अत्याचारग्रस्त महिलांनी कंपनीच्या संचालकांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संचालकांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासंदर्भामध्ये पोलीस प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
महिलांनी केली तक्रार
 
महिलांनी पुढे येऊन पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अनेक दिवसांपासून या पीडित महिला एकत्र येऊन दाद मागण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांचे कोणाही ऐकून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी धाडस दाखवून पोलिसांना याबाबत माहिती दिली. लैंगिक शोषण, अत्याचार, धर्मांतर करण्यासाठी मानसिक दबाव कसा टाकला जात होता, याबाबतची सर्व माहिती पोलिसांना त्यांनी दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई केली आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
हेही वाचा : Justice Yashwant Varma Resigns: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी सुरु असतानाच निर्णय
 
हिंदू तरुणाचे धर्मांतरण
 
कंपनीत काम करणार्‍या हिंदुधर्मीय कर्मचार्‍यांना त्यांच्या धर्मातील कुप्रथा, वाईट गोष्टी सातत्याने सांगितल्या जात असत. त्यांच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला जात होता. कंपनीतील एका हिंदू युवकावर दबाव टाकून धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. त्याबाबतचे फोटो समोर आले आहेत. हिंदू युवकाला आरोपींनी अस्पसंख्याक समाजाप्रमाणे पोशाख घालून धार्मिक चालीरीती पाळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.(Nashik Corporate Jihad Case)
 
२५० कर्मचार्‍यांची चौकशी; फंडिंगचाही शोध घेणार
 
याप्रकरणी असिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार, दानिश शेख या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, निदा खान ही महिला फरार आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त संदीप मिटके करत आहेत.(Nashik Corporate Jihad Case)
 
या प्रकरणात मानसिक दबाव, लग्नाचे आमिष आणि करिअरमधील प्रगतीचे प्रलोभन दाखवून तरुणींचे शारीरिक शोषण करण्यात आले होते. २०२२ पासून पीडितेवर अत्याचार करून तिला एका विशिष्ट धार्मिक चौकटीत जगण्यास भाग पाडले जात होते. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन आता पोलीस प्रशासनाकडून या कंपनीतील २०० ते २५० कर्मचार्‍यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यामागे काही मोठे नेटवर्क किंवा ‘फंडिंग’ आहे का, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.(Nashik Corporate Jihad Case) 
 
पालकांनी हेरला मुलीच्या वागण्यात झालेला बदल
 
या बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेला धर्मांतरणाचा प्रकार रमजान महिन्यात पीडित तरुणीच्या पालकांना समजला. देवळाली कॅम्प परिसरात राहणार्‍या मुलीच्या वागण्यात आणि पेहरावात अचानक बदल झाला. तिने जीन्स-टी-शर्ट सोडून सलवार-कुर्ता वापरण्यास सुरुवात केली, चेहर्‍यावर ओढणी घेण्यास सुरुवात केली.(Nashik Corporate Jihad Case)
 
सुरुवातीला ही तरुणी आधुनिक पेहराव आणि जीवनशैली जपणारी होती. मात्र, कंपनीत कामाला सुरुवात केल्यानंतर काही महिन्यांतच तिच्यात बदल होऊ लागले. पालकांना सुरुवातीला हा केवळ तिचा साधेपणा वाटला. पीडित तरुणीने रमजान महिन्यात चक्क ‘रोजे’ पाळल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांचा संशय वाढला.(Nashik Corporate Jihad Case)
 
पालकांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांना मुलीची आपबिती सर्वांना समजली. त्यांनी तिला धीर दिला. कंपनीत काम करणारे काही ‘टीम लीडर’ कामाचे नियोजन न करता, हिंदू मुलींचे एकप्रकारे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याची धक्कादायक बाब पीडितेने दिलेल्या माहितीतून समोर आली.(Nashik Corporate Jihad Case)
 
हे वाचलंत का? : ‘पॉड टॅक्सी’ : मुंबईच्या शहरी वाहतुकीला नवा वेग
 
धर्मांतरण, लैंगिक शोषण धक्कादायक
 
नाशिकच्या कंपनीतील घडलेली घटना खूप गंभीर असून, पोलिसांनी ती उघडकीस आणली आहे. ‘टेनोलॉजी’ कंपनीमध्ये ज्याप्रको महिला कर्मचार्‍यांवर दबाव आणून धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केले, ते फारच धक्कादायक आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करून याचा पर्दाफाश केला आहे, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
 -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
धार्मिक कटकारस्थानाचाच हा भाग
 
हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही. सामाजिक आणि धार्मिक कटकारस्थानाचा भाग आहे. तत्परतेने कारवाई केल्याबद्दल नाशिक पोलिसांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त करतो. धर्माच्या नावाखाली चुकीचे प्रकार करणार्‍यांविरोधात समाजानेच भूमिका घेतली पाहिजे.
 - नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरेविकासमंत्री
 
कठोर कारवाईची मागणी करणार
 
बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणी आणि महिला काम करत आहेत. त्यांच्यासोबत अशा प्रकारची घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. यामुळे नाशिक हादरून गेले आहे. पोलिसांनी तपास करून हे जगासमोर आणले आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
 - सीमा हिरे, आमदार, नाशिक