वानखेडेवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक फटकेबाजी

    10-Apr-2026
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई :(Devendra Fadnavis)वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक फटकेबाजी ऐकायला मिळाली.सुनील गावसकर यांनी हेल्मेटशिवाय वेगवान गोलंदाजांचा निर्भीडपणे सामना करणे,दिलीप वेंगसरकर यांनी कठीण प्रसंगी संघ सावरण्याची भूमिका,एकनाथ सोलकर यांचे अफाट क्षेत्ररक्षण कौशल्य,दिलीप सरदेसाई यांची परदेशातील कामगिरी, रवी शास्त्री यांची अष्टपैलू कामगिरी यापासून ३६० डिग्री खेळ करणारे सूर्यकुमार यादव,महिला क्रिकेटच्या क्षेत्रात डायना एडुलजी यांचे योगदान यासर्व भारतीय क्रिकेटमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अभ्यासपूर्ण निरीक्षण मांडले.
 
यांसह पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"शहरातील छोट्या मैदानांचे संवर्धन आणि जुन्या लीगसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून वानखेडे मैदान हे सदैव आयकॉनिकच राहील."(Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  मुंबई मेट्रो तीनवर प्रवास झाला अधिक स्वस्त आणि स्मार्ट
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित वानखेडे स्टेडियममधील स्टँड व गेटचा नामकरण सोहळा गुरुवार दि.९ रोजी पार पडला.
 
याप्रसंगी वानखेडे स्टेडियम येथे एकनाथ सोलकर गेट, डायना एडुलजी गेट, दिलीप सरदेसाई गेट आणि रवी शास्त्री स्टँडचे अनावरण करण्यात आले.
 
यावेळी मंत्री आशिष शेलार, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर, टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.(Devendra Fadnavis)