मंत्री चंद्रकांत पाटील यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या केंद्रीय कार्यालयास भेट

    10-Apr-2026
Total Views |
CHANDRAKANT PATIL
 
मुंबई : (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)मुंबई येथील 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद'च्या केंद्रीय कार्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार दि.१० रोजी सदिच्छा भेट दिली व भेटीदरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री गीतेश चव्हाण तसेच इतर पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील म्हणाले की,"यावेळी प्रामुख्याने राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा झाली. तरुणाईच्या मनात राष्ट्रहित आणि शिक्षणाबद्दल असलेली ओढ पाहून मनाला अत्यंत समाधान वाटले." (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
 
हेही वाचा :  मुंबईची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी सोलर सीसीटीव्हीचा मार्ग स्वीकारला
 
याप्रसंगी अभाविपचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)