मुंबई : (Marathwada Rail Coach Factory) लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये (Marathwada Rail Coach Factory) ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या निर्मितीला वेग आला असून एकूण १२० वंदे भारत ट्रेनसेट्स तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून देशभर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती होणार असून, राज्य रेल्वे उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवार दि. १ एप्रिल रोजी लोकसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली.(Marathwada Rail Coach Factory)
रेल्वे प्रकल्प, नवीन गाड्या किंवा सेवांबाबत विविध स्तरांवरून प्रस्ताव येत असतात. या प्रस्तावांचा सातत्याने आढावा घेत योग्यतेनुसार निर्णय घेतले जात असल्याचेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आधुनिक रेल्वेगाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने लातूर येथे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी उभारली असून यासाठी सुमारे ६८५ .७९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.(Marathwada Rail Coach Factory)
या कारखान्यात तंत्रज्ञान भागीदाराच्या सहकार्याने १२० वंदे भारत ट्रेनसेट्सच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यात आले असून त्यामध्ये फॅब्रिकेशन, वेल्डिंग, बोगी सिस्टीम, इलेक्ट्रिकल यांसारख्या तांत्रिक बाबींचा समावेश आहे. तसेच रेल्वेच्या विविध युनिट्समध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाद्वारे फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि मशिनिस्ट या क्षेत्रांत कौशल्य विकासाला चालना दिली जात आहे.(Marathwada Rail Coach Factory)
नाशिक - कल्याण दरम्यान लोकल सेवा शक्य नाही
नाशिक रोड-कल्याण दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचारणा झाल्यानंतर, कसारा–इगतपुरी आणि कर्जत-लोणावळा घाट विभागातील बोगद्यांमध्ये आवश्यक रुंदी नसल्यामुळे सध्या लोकल गाड्या चालवणे शक्य नसल्याचे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले. सध्या या मार्गावर ६૭ जोड्या गाड्या, तर कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर ३६ उपनगरी सेवा उपलब्ध आहेत.(Marathwada Rail Coach Factory)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.