मुंबई : (US-Iran War) इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले असून,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधून आपले सैन्य माघारी बोलावण्याचे सूतोवाच केले आहे. कोणताही करार न करता पुढील २-३ आठवड्यांत सैन्य मायदेशी परतेल, असे त्यांनी म्हटले आहे.(US-Iran War)
नेमकं काय म्हटले ट्रम्प?
ट्रम्प म्हणाले, "इराणकडे अण्वस्त्र नसावीत हा आमचा एकमेव उद्देश होता आणि तो साध्य झालाय, आम्ही आमचं काम पूर्ण करत आहोत. अमेरिका कदाचित दोन आठवड्यांत तेथून बाहेर पडेल, काही दिवस मागे-पुढे होऊ शकतात.आम्हाला त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर कारवाई करायची आहे. मात्र त्याआधी करार होण्याची शक्यता आहे," असंही त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले, करार होऊ शकतो, पण "ते चर्चेसाठी पुढे आलेले नाहीत, मात्र त्याने काही फरक पडत नाही."(US-Iran War)
इराणसोबत कराराची गरज नाही
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "इराणला करार करण्याची गरज नाही. जेव्हा अमेरिकेला खात्री होईल की इराण पुढील अनेक वर्षं अण्वस्त्र तयार करू शकणार नाही, तेव्हा अमेरिका इराणमधून बाहेर पडेल."(US-Iran War)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\