Sunetra Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर

राजकीय तर्क वितर्क जोरावर

    01-Apr-2026
Total Views |
Sunetra Pawar
 
मुंबई : (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बुधवार दि.१ रोजी दिल्ली दौऱ्यावर असून एन डी ए मधील महत्वाच्या नेत्यांना त्या गुरुवार दि.२ रोजी भेटणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता ही भेट महत्वाची मानली जाते.कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांतर्गत उफाळून आलेले वाद .विशेषता पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष यांना अधिकार देण्याच्या मुद्यावर पक्षात दोन गट पडले आहेत.आणि पक्ष विलीनीकरणबाबत मत मतांतर तसेच पक्षावर नेमके नियंत्रण कुणाचे आहे याबाबत सुरू असलेली चढाओढ, आणि यातच मंत्री नरहरी झिरवळ यांचे वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण समोर आले आहे.अशोक खरात यांचे प्रकरणही सध्या गाजत असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि महिला आयोगाच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला आहे.त्यांना एस आय टी ने समन्स देखील बजावले आहे.तसेच विविध बाबीत सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांना देखील विरोधक लक्ष करत आहेत.त्यातच बुधवार दि.१ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ती भेट होऊ शकली नाही.(Sunetra Pawar)
 
बारामती विधानसभा पोटनिवडणूक देखील असून या जागेवर सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत.यासर्व घडामोडी पाहता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांचा अचानक दिल्ली दौरा म्हणजे राजकीय तर्कवितर्कांना वेग देणारा ठरला आहे. त्यातच प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटविले की काय अशा चर्चा बुधवार दि.१ रोजी जोरदार रंगल्या होत्या.(Sunetra Pawar)