UPI Payment Rules : आता फक्त ओटीपी पुरेसा नाही! ऑनलाइन पेमेंटच्या नियमांमध्ये बदल; नेमकं काय बदललंय?

    01-Apr-2026   
Total Views |

UPI Payment

मुंबई : (UPI Payment Rules 2026)
आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्तीचे केले आहे. यामुळे आता फक्त एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, तर तुम्हाला सुरक्षेच्या दोन टप्प्यांमधून जावे लागणार आहे. यामुळे तुमची डिजिटल सुरक्षा पहिल्यापेक्षा अधिक विश्वासार्ह होईल. (UPI Payment Rules 2026)

नेमकं काय बदलणार आहे?

आत्तापर्यंत आपण एकच स्टॅटिक पिन वापरून झटपट पेमेंट करायचो. पण आता बँकेला किंवा फिनटेक कंपन्यांना तुम्हाला दोन पर्याय द्यावे लागतील. यातला एक पर्याय डायनॅमिक असणं बंधनकारक आहे. प्रत्येक व्यवहारावेळी नवा OTP जनरेट करावा लागेल. म्हणजेच, तो कोड किंवा सुरक्षा निकष प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा असेल आणि तो त्याच वेळी तयार होईल. नेहमीचा यूपीआय पिन टाकावा लागेल आणि मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्डही द्यावा लागेल. तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी आणि तुमचे रजिस्टर असलेले डिव्हाइस यांची पडताळणी केली जाईल. हार्डवेअर टोकन किंवा पासवर्डचा वापर करून ओळख पटवली जाईल.(UPI Payment Rules 2026)

आरबीआयने या नियमात बँका आणि कार्ड कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. जर या नव्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड झाली आणि त्यामुळे ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकेची किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची असेल. यामुळे बँकांना आता आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी लागणार आहे. परदेशी वेबसाईट्स किंवा अ‍ॅप्सवर केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी हे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. एखादे पेमेंट संशयास्पद आढळल्यास बँक किंवा पेमेंट कंपनी त्याची अधिक चौकशी करू शकते. (UPI Payment Rules 2026)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\