PM Modi Assam Visit : आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी १ एप्रिल रोजी दिब्रुगढमधील दौऱ्यादरम्यान एका चहाच्या मळ्याला भेट दिली. त्यांनी तिथे काम करणाऱ्या महिला कामगारांशी संवाद साधला आणि स्वतः चहाची पाने खुडून हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या चहाच्या मळ्याच्या दौऱ्याची छायाचित्रे…
पारंपारिक पद्धतीने चहाची पानं खुडताना पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी महिला कामगारांशी संवाद साधला

चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना अभिवादन करताना
महिला कामगारांनी आसामचे पारंपरिक बिहू नृत्य सादर करत केले पंतप्रधान मोदींचे स्वागतपंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर चहाच्या मळ्याला दिलेल्या भेटीचा अनुभव शेअर करत म्हटले की, "चहा हा आसामचा आत्मा आहे! येथील चहाने जगभर आपला ठसा उमटवला आहे. दिब्रुगढमधील चहाच्या मळ्याला भेट देऊन तिथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. हा एक अविस्मरणीय अनुभव होता." हे कामगार चहा उद्योगाचा कणा मानले जातात. पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाचे कौतुकही केले.