मुंबई : (Donald Trump reacted to Iran's appointment of Mojtaba Khamenei) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत, इराणने अखेर आपला नवा सर्वोच्च नेता निवडला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे. इराणमधील या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, अमेरिकेच्या मान्यतेशिवाय इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही, असा इशारा दिला आहे.(Donald Trump reacted to Iran's appointment of Mojtaba Khamenei)
माझ्या मंजुरीशिवाय इराणचा पुढचा नवीन नेता जास्त काळ टिकू शकणार नाही - ट्रम्प
मोज्तबा खामेनी यांच्या निवडीवर व्हाइट हाऊसने तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, इराणचा पुढचा सर्वोच्च नेता त्यांच्या मंजुरीशिवाय फार काळ टिकणार नाही. दरम्यान, इस्रायली लष्कराने इशारा दिला आहे की ते खामेनींच्या कोणत्याही संभाव्य उत्तराधिकारी आणि त्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लक्ष्य करेल. ट्रम्प यांनी मोज्तबा खामेनी यांची निवड अमान्य करताना त्यांना 'अकार्यक्षम' आणि 'कमकुवत' म्हटले.(Donald Trump reacted to Iran's appointment of Mojtaba Khamenei)
मोज्तबा यांची निवड कशी झाली?
इराणमधील ८८ अत्यंत प्रभावशाली धार्मिक नेत्यांची संघटना असलेल्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने मोज्तबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. इराणच्या कायद्यानुसार, सर्वोच्च नेत्याची निवड ही लोकशाही पद्धतीने होत नाही, तर ही परिषद धार्मिक आणि राजकीय पात्रता पाहून निर्णय घेते. लष्करी संघटना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) चा त्यांना मोठा पाठिंबा आणि प्रभाव असल्याने हे निवडीचे पाऊल उचलले गेले.(Donald Trump reacted to Iran's appointment of Mojtaba Khamenei)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\